सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पोलिसांना खोटी माहिती दिल्याने सुंदर्दे येथील एकावर गुन्हा नंदुरबार - तालुक्यातील सुंदर्दे येथे चोराला पकडून ठेवल्याची खोटी माहिती पोलिसांना दिल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,सुंदर्दे येथील मगन (पप्पू) याने दि.२३ जुन रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास पोलिसांना आपल्या मोबाईलवर फोन करून सांगितले की,सुंदर्दे येथे अभय युवा कल्याण हायस्कूल जवळ एका चोराला पकडून ठेवले आहे.पोलिस गाडी पाठवा, पोलिस मदत पाठवा. त्याअनुषंगाने पोलिस सुंदर्दे येथे गेले असता तसा काही प्रकार घडला नसल्याचे पोलिस पाटील यांनी सांगितले. याबाबत वरील आरोपींविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.