सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत कैलास बनला पीएसआय रोझवा पुनर्वसन वसाहतीतील युवकाची पहिल्याच प्रयत्नात यशोगाथा

तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन या प्रकल्प बाधितांच्या वसाहतीतील कैलास रमेश पावरा यांनी आपल्या क

Sudarshan MH
  • Jul 13 2023 3:54PM
प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत कैलास बनला पीएसआय
 रोझवा पुनर्वसन वसाहतीतील युवकाची पहिल्याच प्रयत्नात यशोगाथा
तळोदा....
 
तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन या प्रकल्प बाधितांच्या वसाहतीतील कैलास रमेश पावरा यांनी आपल्या कठोर मेहनतीच्या बळावर एमपीएससीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून अवघ्या चोवीसाव्या वर्षी पोलीस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे त्याचे रोझवा पुनर्वसन गावासह तालुक्यातून कौतुक होत आहे.
               रोझवा पुनर्वसन  वसाहतीतील रमेश पावरा व चिकीबाई पावरा हे दाम्पत्य राहत असून त्यांना दोन मुले व एक मुलगी असून त्यांना  पुनर्वसनानंतर अद्यापही  शेती मिळाली नसून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच मुलांचे शिक्षण शेतात शेतमजुरी तसेच मिळेल ते काम करून करीत आहेत. रमेश पावरा यांच्या तिन्ही मुलांनीही आपल्या आई-वडिलांसोबत मजुरी, मेहनत करून शिक्षण सुरू ठेवले. त्याचबरोबर आपल्या आई वडिलांना हातभार लावला. त्यांच्या मोठा मुलाचेही शिक्षण झाले असून सध्या तो बांधकाम व्यवसायात कुशल कारागीर आहेत, तर मुलीचेही पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले आहे.कैलास यांनी कठीण काळातही शिक्षण व अभ्यासाची गोडी कमी होऊ दिली नाही व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आपले ध्येय गाठले .त्यामुळे पावरा कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
 रख हौसला वो मंजर भी आयेगा, प्यासे के पास चल के समंदर भी आयेगा, 
 थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर,
 मंजिल भी मिलेगी....
 और मिलने का मजा भी आयेगा..
 असे कैलास पावरा याने आपल्या मनात ठाणून प्रतिकूल परिस्थिती समोर गुडघे न टेकता शिक्षण सुरू ठेवले. गावातील जि प शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पाचवी ते 12 पर्यंत शिक्षण धुळे जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय मोराणे येथे करून त्यानंतर जळगाव येथील मुळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेचे पदवीचे शिक्षण घेतले. कैलास पावराने कोणताही क्लास न लावता सेल्फ स्टडीवर भर दिला. यावेळी त्याला अनेक मित्रांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मदत केली, त्याचबरोबर सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुहास वसावे यांनी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्याने जिद्दी,चिकाटी व कठोर परीश्रम घेऊन एमपीएससीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात बाजी मारत या परीक्षेत साडेसहाशे जणांमध्ये कैलास पावरा हा सर्वात कमी वयाचा असल्याचा मान मिळवला. कैलासची ही यशोगाथा ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी प्रेरणादायी आहे.
       चौकट
 पदवीच्या तृतीय वर्षाला असताना कैलासने एमपीएससीची पूर्व परीक्षा दिली. सप्टेंबर 2022 मध्ये मुख्य परीक्षा झाली त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये मैदानी चाचणी तर मार्च 2023 मध्ये मुलाखत पार पडली. या परीक्षेच्या अंतिम निकाल जाहीर झाला असून यात कैलासने यश संपादन करून पीएसआय पदाला गवसणी घातली आहे. या युवकाने मैदानी चाचणीत शंभर पैकी 93 गुण घेऊन आपले वर्चस्व सिद्ध केले .
.......….......................
 माझे आई-वडील, गुरुजन ,मित्रमंडळी सर्वांनी वेळोवेळी मला प्रोत्साहन दिले त्यासाठी त्यांचा कायम ऋणी राहील तसेच माझ्या कार्यकर्तृत्वातून सामान्याना न्यान मिळावा यासाठी प्रयत्नशील राहील तसेच गाव व परिसरातील तरुण,तरुणी अधिकारी व्हावेत यासाठी नेहमीच माझे सहकार्य राहील .
कैलास पावरा

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार