सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अक्कलकुवा पोलीस स्टेशनची व्हॅन पावसामुळे घसरून अपघात झाल्याने पोलीस निरीक्षकासह दोन जण जखमी झाल्याची घटना सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान गुजरात राज्यातील तुलसा गावाजवळ घडली.

सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान गुजरात राज्यातील तुलसा गावाजवळ घडली.

Sudarshan MH
  • Jul 12 2023 7:54PM
अक्कलकुवा प्रतिनिधी -योगेश्वर बुवा 
 अक्कलकुवा पोलीस स्टेशनची व्हॅन पावसामुळे घसरून अपघात झाल्याने पोलीस निरीक्षकासह दोन जण जखमी झाल्याची घटना सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान गुजरात राज्यातील तुलसा गावाजवळ घडली.
      मात्र सुदैवाने जीवितहानी टळली
     सविस्तर वृत्त असे की, अक्कलकुवा येथून नंदुरबारच्या दिशेने जाणारी एम एच 39 एबी 857 क्रमांकाची पोलीस गाडी गुजरात राज्यातील मौलिपाडा ते तुलसा गावादरम्यान रस्त्यावरून घसरून शेतात पलटी मारत गेल्याने या गाडीत असलेले गाडीचे चालक राजू मोरे ,पोलीस नाईक जगदीश गांगुर्डे व  पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत हे तीन कर्मचारी प्रवास करत असताना हा अपघात घडून आला. यातील जगदीश गांगुर्डे यांना डोक्यात दुखापत झाली असून राजू मोरे व पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना देखील किरकोळ मार लागल्याचे समजते. या जखमी अधिकारी व कर्मचाऱ्यांना नंदुरबार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही. गेल्या दोन-तीन दिवसापासून परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरून पाण्यासोबत चिखलही वाहून जात असल्याने अशा प्रकारचे अपघात घडून येतात.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार