सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सरी ते दहेल दरम्यान असलेला घाटाचा रस्ता देतोय मृत्यूला आमंत्रण.

संबंधित विभाग व प्रशासन यांचे साफ दुर्लक्ष.

Sudarshan MH
  • Jul 12 2023 7:41PM
अक्कलकुवा प्रतिनिधी-योगेश्वर बुवा 7057283888    
     अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सरी ते दहेल दरम्यान असलेला घाटाचा रस्ता देतोय मृत्यूला आमंत्रण.
     अनेक वर्ष होऊन देखील सदर घाटाची दुरुस्ती न झाल्याने प्रवाशांचे हाल.
         संबंधित विभाग व प्रशासन यांचे साफ दुर्लक्ष.
     सविस्तर वृत्त असे की, अक्कलकुवा तालुक्यातील बहुतांश भाग हा सातपुड्याच्या द-या खोऱ्यात वसलेला आहे. अक्कलकुवा हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे सर्व शासकीय कामानिमित्त मोलगी परिसरातील लोकांना अक्कलकुवा शहराला यावे लागते. मात्र दुर्गम भागातून खाली येत असताना अनेक घाट रस्त्यातून प्रवास करून अक्कलकुवा शहर गाठावे लागते. यासाठी देवगोई घाट, खाई- कंकाळमाळ घाट , ओहवा- कुवा घाट, होराफळी घाट या मार्गाने वरच्या परिसरातील जनता अक्कलकुवा येथे येत असतात. व या पावसाळ्यात जागो जागी दरडी कोसळून रस्ते बहुतांश वेळा बंद देखील होत असतात.
    यावर्षी  सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे  घाटात अनेक ठिकाणी रस्ता पाण्याच्या प्रवाहाने पोखरला गेल्यामुळे  कोणत्या वाहनाचा केव्हा अपघात होईल काही सांगता येत नाही. त्यातच सरी ते दहेल दरम्यान असलेल्या घाटात रस्ता तयार केला नाही त्यामुळे अतिशय जीव धोक्यात घालून वाहन चालकास आपले वाहन चालवावे लागते. मात्र याकडे संबंधित विभागाचे साफ दुर्लक्ष होत असल्याने जनतेत नाराजी पसरलेली आहे. रस्त्यांसाठी शासन करोडो रुपये खर्च करतो मात्र प्रत्यक्षात अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात रस्त्यांची पार दुरावस्था झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार