सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तळोदा तालुक्यातील आमलाड ते बहुरुपा गावाजवळ ७ लाखांचा मद्यसाठा तळोदा पोलिसांनी जप्त केला. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Sudarshan MH
  • Jul 15 2023 3:45PM
तळोदा प्रतिनिधी........

तळोदा तालुक्यातील आमलाड ते बहुरुपा गावाजवळ ७ लाखांचा मद्यसाठा तळोदा पोलिसांनी जप्त केला. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना आमलाड ते बहुरूपा दरम्यान मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी एका वाहनातून सुमारे ७ लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार,

सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल, सपोनि अविनाश केदार, सागर गाडीलोहार, पुना पाडवी, पोना अजय पवार, पोना विलास पाटील, विजय जावरे, पो.शि.संदीप महाले, महिला एएसआय संगीता बाविस्कर यांच्या पथकाने केली. चालक वाहन सोडून फरार झाला आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती......

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार