सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अक्कलकुवा येथील सहायक आयुक्त पशुसंवर्धन कार्यालयाची करोडो रुपये खर्च करून तब्बल पाच वर्षापासून तयार झालेली इमारत धूळखात पडून.

तब्बल पाच वर्षापासून तयार झालेली इमारत धूळखात पडून.

Sudarshan MH
  • Jul 10 2023 9:57PM
वाण्याविहीर प्रतिनिधी-योगेश्वर बुवा 7057283888
     अक्कलकुवा येथील सहायक आयुक्त पशुसंवर्धन  कार्यालयाची  करोडो रुपये खर्च करून तब्बल पाच वर्षापासून तयार झालेली इमारत धूळखात पडून.
  पडक्या इमारतीतच पशुवैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय सुरू.चौकशीची गरज.
     अक्कलकुवा येथील सहायक आयुक्त पशुसंवर्धन   कार्यालयाची नवीन करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेली इमारत धुळखात पडली असून जीर्ण झालेल्या पडक्या इमारतीतच पशुवैद्यकीय दवाखाना सुरू असल्याची गंभीर स्थिती अक्कलकुवा येथे दिसून येत आहे.
         तब्बल पाच वर्ष उलटूनही इमारत का  ताब्यात देण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अक्कलकुवा हे तालुक्यातील शहराचे ठिकाण असून या शहरात पशुसंवर्धन विभागाची सुसज्ज इमारत करोडो रुपये खर्च करून पाच वर्षांपासून बांधून तयार आहे. मात्र अद्यापपर्यंत सदर इमारतीत कार्यालयाचे स्थलांतर न झाल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.आजच्या घडीला अतिशय जीर्ण झालेल्या इमारतीत संबंधित पशुसंवर्धन विभागाचे कार्यालय सुरू आहे.व या कार्यालयाला पावसाळ्यात गळती लागली आहे.यामूळे अधिकारी व कर्मचारी यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.या इमारतीत अद्यापपर्यंत वीजेची उपकरणे बसविण्यात आले नसल्याचे सांगितले.जर पाच वर्षे इमारत तयार होऊन झाले तर अजूनपर्यंत वीजेची सोय का करण्यात आली नाही.हत्ती गेला पण शेपूट राहिली अशी स्थिती या इमारतीची झाली आहे.मात्र याकडे कोणाचेही लक्ष दिसून येत नाही.तरी संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन नवीन इमारतीचे काम पूर्ण करून ताब्यात देण्यात यावी.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार