सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मेरी माटी, मेरा देश : देशव्यापी अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजकपदी भाजपचे राजेश पांडे यांची निवड

महाविजय २०२४: पुणे महानगरपालिके सोबतच भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्याकडे शिरूर लोकसभेच्या समन्वयाची जबाबदारी

Deepak Chavhan
  • Aug 3 2023 8:03PM
पुणे:- मन की बात' या लोकप्रिय कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या "मेरी माटी, मेरा देश" या देशव्यापी आणि लोकाभिमुख अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजकपदी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांची निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयासाठी भारतीय जनता पार्टीच्या 'महाविजय २०२४' साठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयकपद म्हणून पांडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. बावनकुळे यांच्या हस्ते दोन्ही निवडीचे पत्र पांडे यांना बुधवारी (२ जुलै २०२३) मुंबईत प्रदेश कार्यालयात प्रदान करण्यात आले. 

देशासाठी प्राणांची बाजी लावलेल्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'मेरी माटी, मेरा देश' उपक्रम साकार होत आहे. या देशव्यापी अभियानात 'मिट्टी यात्रा', 'वसुधा वंदन', 'वीरो को वंदन', 'ध्वज वंदन', शिलाफलकांची उभारणी अशा उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची महाराष्ट्रात राज्यभर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पांडे यांच्यावर असेल. 

उपक्रमाचा समारोप दिल्लीत कर्तव्य पथावर ७५०० युवकांच्या उपस्थितीत होईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत युवकांना पंचप्राण शपथ देऊन देशभरातून गोळा केलेल्या मातीतून अमृत वाटिकेचे निर्माण करण्यात येईल. या अभियानाने 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' स्मारकाचे समर्पण करण्यात येईल. 


देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आम्ही यापूर्वी 'हर घर तिरंगा' विश्वविक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मदतीने राबविला. देशाचा अभिमान जागविणारे "मेरी माटी, मेरा देश" अभियान महाराष्ट्रात प्रत्येक नागरिकांपर्यंत आणि ४० लाख युवकांपर्यंत घेऊन जाण्याचा आमचा संकल्प आहे. 

‘संघटन हेच सामर्थ्य’ या विश्वासातून मी गेली ४० वर्षे संघटनेत कार्यरत आहे. नवीन जबाबदारीतही त्याच निष्ठेने पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वांसोबत काम करेन. माझ्यावर विश्वास ठेवून दिलेल्या जबाबदारीबद्दल मी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आणि उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मनापासून आभार मानतो.राजेश पांडे उपाध्यक्ष,भाजप ,महाराष्ट्र प्रदेश

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार