सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

45 वर्षापासून प्रलंबित वनपट्टे अतिक्रमण धारकांचा विषय मार्गी लागणार : आमदार राजेश पाडवी

आमदार राजेश पाडवी

Sudarshan MH
  • Jul 29 2023 7:14PM



तळोदा प्रतिनिधी....


तळोदा तालुक्यातील अमोनी, रोझवा,चौगाव,रापापुर,सोमावल खुर्द, डेकाडी, कालबेली इत्यादी वनपट्टे धारक गावातील साधारण 659 वन हक्क दाव्यासाठी / अतिक्रमण धारक 45 वर्ष पासून वंचित होते. सदर वन पट्टे अतिक्रमण धारकाच्या ताब्यात असून शासनाकडून वेळोवेळी अति-पावसामुळे अन्य कारणामुळे पिकांचे झालेल्या नुकसानीचे मदत देखील मिळत आहे. परंतु वनपट्टे यांच्या नावावर होत नव्हते, कारण सदर जमीन महसूल विभागाला हस्तांतरित केल्यामुळे जिल्हास्तरीय प्रशासन कोणत्याही निर्णय घेऊ शकत नव्हते व शासनाकडे वारंवार मार्गदर्शक मागत होते. 

याबाबत कार्यसम्राट आमदार राजेश पाडवी  यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा सभागृहात लक्षवेधी आयूधाद्वारे सभागृहाला व शासनाला बाब निदर्शनास आणून दिली. 

तसेच  राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आज दिनांक 27/7/2023 रोजी विधान भवनात मंत्री महोदयाच्या दालनात बैठक संपन्न झाली. 
सदर बैठकीला महसूल मंत्री, कार्यसम्राट आमदार राजेश  पाडवी अतिरिक्त मुख्य सचिव,प्रधान सचिव, महसूल विभागाचे उच्च अधिकारी, नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मनीषा खत्री, वन हक्क समिती नंदुरबार च्या प्रमुख सदस्य उपस्थित होते.

यावेळी,शासन योग्य निर्णय घेउन  मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची मान्यता घेऊन तात्काळ,वनपट्टे धारकांना सातबारा नावावर करण्यात येतील असा निर्णय झाला.




.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार