सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अक्कलकुवा कडून गुजरात च्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक सकाळी खापर येथील होंडा शोरूम च्या समोर राष्ट्रीय महामार्ग नेत्रंग- शेवाळी महामार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आढळल्याने चालक व वाहक बाल बाल बचावले.

महामार्ग नेत्रंग- शेवाळी महामार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आढळल्याने चालक व वाहक बाल बाल बचावले.

Sudarshan MH
  • Jul 9 2023 10:55AM
अक्कलकुवा प्रतिनिधी- योगेश्वर बुवा 7057283888
     अक्कलकुवा कडून गुजरात च्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक सकाळी खापर येथील  होंडा शोरूम च्या समोर राष्ट्रीय महामार्ग नेत्रंग- शेवाळी महामार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आढळल्याने चालक व वाहक बाल बाल बचावले.
     परिसरातील नागरिकांकडून मदत.
     सविस्तर वृत्त असे की, शेवाळी- नेत्रंग महामार्गावरील खापर गावाजवळील होंडा शोरूम समोर अक्कलकुवा कडून गुजरात च्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक GJ 01OZ 3843 हा रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडावर जाऊन आदळला. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून  गाडीचा चालक मध्ये अडकून पडल्याने मोठ्या अथक परिश्रमाने त्याला कटरच्या साह्याने गाडीचे काही भाग कापून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र चालकाला बऱ्यापैकी दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. या घटनेची माहिती खापर येथील रहिवासी मनोज भाई गोस्वामी यांनी पत्रकार योगेश्वर बुवा यांना माहिती दिली असता त्यांनी ताबडतोब अक्कलकुवा येथील पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित यांना माहिती दिल्यानंतर ताबडतोब कार्यवाहीला सुरुवात झाली व संबंधित चालकाला ट्रक मधून बाहेर काढण्यात आले.व त्याचा जीव वाचला.यावेळी परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात आली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार