सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

छत्तीसगड : चार नक्षलवाद्यांना कंठस्नान, पोलीस उपनिरीक्षक शहीद

छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. मात्र या चकमकीत एक पोलिस निरीक्षक देखील शहीद झाला आहे.

Sudarshan MH
  • May 9 2020 12:30PM

छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. मात्र या चकमकीत एक पोलिस निरीक्षक देखील शहीद झाला आहे. 

दुर्ग क्षेत्रातील पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी सांगितले की, छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त असलेला मानपूर ठाणा क्षेत्रातील पारधोनी गावाजवळ शुक्रवारी रात्री ही चकमक झाली. यामध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र, या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक श्‍याम किशोर शर्मा हे  शहीद झाले आहेत. 

ठार करण्यात आलेल्या चार नक्षलवाद्यांमध्ये दोन महिला नक्षलींचा समावेश आहे. चकमकी नंतर जवानांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच त्यांच्याकडून एक एके – 47 रायफल, एस एल आर रायफल आणि दोन 315 – बोर रायफल सह शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. 


पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितनुसार, शहीद पोलीस उपनिरीक्षकाचे पार्थिव राजनांदगाव मुख्यालयात नेण्यात आले आहे. पुढे ते म्हणाले, या क्षेत्रात नक्षलवाद्यांच्या विरोधात अभियान सुरू आहे. यापूर्वी 12 जुलै 2009 मध्ये याच क्षेत्रात झालेल्या चकमकीत पोलीस अधीक्षक वी. के. चौबेसह 9 पोलीस शहीद झाले होते. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार