सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोल्हापूर जिल्ह्यासाठी महायुतीचे खासदार मंडलिक यांनी तब्बल 800 कोटीचा निधी आणला

कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार मंडलिक यांनी 800 कोटी रुपयांचा निधी आणला, असे कागल तालुका शिवसेना प्रमुख सुधीर पाटोळे म्हणाले.

Shruti Patil
  • Apr 26 2024 8:15AM
कोल्हापूर: कोल्हापूरचा खासदार म्हणून संजय मंडलिक यांनी केंद्र व राज्य शासनाकडे निधीचा पाठपुरावा करून मोठी विकास कामे केली आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार मंडलिक यांनी 800 कोटी रुपयांचा निधी आणला, असे कागल तालुका शिवसेना प्रमुख सुधीर पाटोळे म्हणाले. कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पिराचीवाडी, ता.कागल येथे महायुतीच्या प्रमुख नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ बैठकीत ते बोलत होते.
 
गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ म्हणाले, महायुतीला जिल्ह्यातून दिवसेंदिवस मिळणारा वाढता आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, प्रा. संजय मंडलिक यांचा विजय निश्चित आहे. यावेळी माजी सरपंच सुभाष भोसले म्हणाले, येणाऱ्या ०७ मे रोजी प्राचार्य संजय मंडलिक यांच्या धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून संजय मंडलिक यांना प्रचंड मतांनी विजयी करूया.
 
यावेळी सुनीलराज सूर्यवंशी, ईगल प्रभावळकर, दत्ता पाटील केनवडेकर, यशवंत गुरव, प्रकाश भिऊंगडे युवराज पाटील (बापू), प्रताप उर्फ भैय्या माने, , संभाजी गौड,एच.डी. भोसले, ज्ञानदेव पाटील, नायाजी भोसले, अरुण भोसले, कृष्णात भोसले, युवराज माने, वसंत रोडे, महादेव माने, पांडुरंग दाभोळे, जिवन भोसले, रामदास भोसले, अजित फकीर, दत्तात्रय दाभोळे, महायुतीचे प्रमुख मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार