सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षणाचा निर्णय देणार्‍या न्यायमूर्तींना पुन्हा धमक्या; न्यायाधिशांच्य सुरक्षेत वाढ

न्यायाधिशांनी सांगितले की, गेल्या २० ते २४ दिवसांत त्यांना १४० ‘कोड नंबर’वरून अनेक वेळा धमकीचे दूरध्वनी आले आहेत.

Shruti Patil
  • Apr 26 2024 9:05AM

वाराणसी: ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षणाचा निर्णय घोषित करणारे न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांना विदेशातून धमकीचे दूरध्वनी येत आहेत. न्यायाधिशांनी सांगितले की, गेल्या २० ते २४ दिवसांत त्यांना १४० ‘कोड नंबर’वरून अनेक वेळा धमकीचे दूरध्वनी आले आहेत. न्यायाधीशांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून यासंदर्भात तक्रार केली आहे.

ज्ञानवापी खटल्याचा निकाल दिल्यानंतर प्रसिद्धीझोतात आलेले रवि कुमार दिवाकर सध्या बरेली येथील ‘फास्ट ट्रॅक कोर्ट २’ मध्ये न्यायाधीश आहेत. काही काळापूर्वी त्यांनी मौलाना तौकीर रझा यास वर्ष २०१० मधील दंगलीच्या प्रकरणी मुख्य आरोपी घोषित केले होते. या कालावधीत न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांना परदेशातून दूरध्वनीवरून धमकावणे चालू झाले होते. या धमकीनंतर प्रशासनाने न्यायाधिशांची सुरक्षा अधिक कडक केली आहे.

या प्रकरणाचे ‘सायबर सेल’कडून अन्वेषण करण्यात येत आहे. ‘यामध्ये जे काही तथ्य समोर येईल त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल’, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुशील घुले यांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार