वेरूळ: ॐ जगद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने चालू असलेल्या ॐ जगद्गुरू जनशांती धर्मसोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अक्षयतृतीयेनिमित्त आयोजित या सोहळ्याच्या सहाव्या दिवशी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री नामदार संजय शिरसाठ यांनी उपस्थिती लावून प.पू. बाबाजींचा आशीर्वाद घेतला.
या वेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी महापौर नंदकुमारजी घोडेले, माजी महापौर विकासजी जैन यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. जय बाबाजी भक्त परिवार यांच्या वतीने सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना मंत्री शिरसाठ म्हणाले, “बाबाजींच्या आशीर्वादामुळेच आज माझ्या राजकीय जीवनात मोठी उन्नती झाली आहे. त्यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे चार आमदार निवडून आले व मी स्वतः मंत्री झालो. ही माझी कृतज्ञ भावना आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “शांतिगिरी महाराज आता जगद्गुरू म्हणून कार्यरत असून ते नव्या पिढीवर संस्कार घडवण्याचे महान कार्य करत आहेत.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बाबाजींना अभिवादन करत, “तुम्ही आम्हाला आदेश करा,” असा निरोप मंत्री शिरसाठ यांच्यामार्फत पाठवल्याचीही त्यांनी यावेळी आवर्जून माहिती दिली.
श्री क्षेत्र वेरूळ येथे पार पडत असलेल्या या धर्ममहासोहळ्यात संत, महंत व हजारो भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने सहभागी होत असून, अध्यात्म व संस्कारांचे वारे या पवित्र भूमीत वाहत आहेत.