सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पंढरपूरमध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या माजी शहराध्यक्षाला तोंडा काळे करून चांगलाच चोपले....,राम कदम भडकले

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून भाजप आणि शिवसेनेत या ना त्या मुद्यावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. पण आता मुद्याची लढाई पार गुद्यावर आली आहे

Sudarshan MH
  • Feb 7 2021 10:52AM

महाविकास आघाडी सरकार  सत्तेवर आल्यापासून भाजप आणि शिवसेनेत या ना त्या मुद्यावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. पण आता मुद्याची लढाई पार गुद्यावर आली आहे. पंढरपूरमध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या  माजी शहराध्यक्षाला तोंडा काळे करून चांगलाच चोप दिला. या कृत्यावरून भाजपचे आमदार राम कदम शिवसेनेवर चांगलेच संतापले आहे.

राम कदम यांनी शिवसैनिकांनी भाजपच्या माजी शहराध्यक्षाला मारहाणीचा व्हिडीओ ट्वीट करुन शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

 

 

 

पंढरपूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या पोलिसांच्या समोर कायदा हातात घेऊन नंगानाच ? राज्यात सत्ता आहे याचा इतका दुरुपयोग, सैनिकाच्या घरात घुसून त्याला मारण्यापासून पंढरपूरच्या रस्त्यावर खुद्द पोलिसांसमोर कायदा हातात घेण्यापर्यंत शिवसेना कार्यकर्त्यांची मजल जाते, अशा शब्दांत राम कदम यांनी संताप व्यक्त केला.

तसंच, हे सगळे ठरवून होत आहे का? निद्रिस्त अवस्थेत असलेला महाविकास आघाडी सरकारने या हल्लेखोरांवर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारत त्याची जागा दाखवून देईल, असा इशाराही राम कदम यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार,पंढरपूर भाजप माजी अध्यक्ष शिरीष कटेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यामुळे पंढरपूरमध्ये शिवसैनिकांनी कटेकर यांच्या तोंडाला काळे फासले. विठ्ठल मंदिर परिसरातील नामदेव पायरी ते पश्चिम द्वारापर्यंत कटेकर यांची धिंड काढली. यावेळी शिवसैनिकांनी कटेकर यांना चोप देत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.

शुक्रवारी 5 फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे विज बिल विरोधात आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील वीज महामंडळाच्या विभागीय कार्यालयात टाळे बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात शिवराळ शब्दांचा वापर केला. त्या भाषणांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीकाही केली.

याचा जाब विचारण्यासाठी पंढरपूर शिवसेना माजी अध्यक्ष संदीप केंदळे यांच्यासह शिवसैनिकांनी कटेकर यांच्या अंगावर काळे ऑईल ओतून त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. त्यांची नामदेव पायरी ते पश्चिमद्वार अशी धिंड काढण्यात आली. कटेकर यांच्या हातात बांगड्या, हार, बुक्का लावून या वक्तव्याचा जाहीर निषेध शिवसेनेकडून करण्यात आला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार