सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*सेल्फी ने परत घेतले दोन बळी*

वर्धा उमरी येथील पाच जण धावसा (हेटी)येथील मित्राला घेऊन तलावात सेल्फी काढायला गेले असताना, दोघे बुडाले तर तिघे बचावले.

Snehal Joshi
  • Jul 6 2020 1:06PM
वर्धा उमरी येथील पाच जण  धावसा (हेटी)येथील  मित्राला घेऊन तलावात सेल्फी काढायला गेले असताना, दोघे बुडाले तर तिघे बचावले. यात उमरी येथील तेजस चोपडे (15) आणि हर्षल चौधरी (16)यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना 5 मे रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी देवळातून तलावावर  सेल्फी काढायचा नादात घडली आहे. 

 सेल्फी काढायला आलेले मित्र काही काय तलावाच्या आजूबाजूला फिरले. आणि फोटो काढायला सुरुवात केली. त्यानंतर तलावात असलेल्या पाणीपुरवठा च्या विहिरीच्या बाजूला खोल खड्ड्याच्या  बाजूला सेल्फी काढत असताना. एकाचा पाय घसरला तर त्याच्यासोबत चार जणांनी साखळी करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता. दुसरा पडला.  एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात याचाही  पाचही युवक तलावात पडले. यात  धावस हेटी  येथील हर्षल कालभूत हा  बाहेर काही अंतरावर उभा होता. त्याच्या घटना लक्षात येताच त्याने मित्र  बुडत असताना धावत येउन पाय दिला असता. एक एक करत तिघांना बाहेर काढले. मात्र दोघांना वाचवण्यात अपयश आले.  या घटनेने दोन्ही गावात  शोककळा पसरली. घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन मोहोडूळे, नितेश वैद्य, गुड्डू थुल, निखिल फुटाणे हे घटनास्थळी पोहोचले. तलावात चार जणांकडून शोध कार्य करण्यात आले. आशिष  कोटजावरे, रोशन कुंभरे, मारोती मेश्राम, उत्तम कोटजावरे सतीश पंचभाई या यांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार