सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गोळ्या घेऊन झोपा आता! चंद्रकांत दादांचा सल्ला

राज्यात कोरोनाचे थैमान इतर अनेक प्रश्न डोक्याचा भुसा करताहेत . सोबतच सरकार पाडापाडीच्या चर्चेही जोर धरीत आहे. गेल्या काही दिवसांपासून यावरून राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक चकमकी झडताना दिसून येत आहे.

Snehal Joshi .
  • Jul 20 2020 10:58PM
राज्यात कोरोनाचे थैमान इतर अनेक प्रश्न डोक्याचा भुसा करताहेत . सोबतच सरकार पाडापाडीच्या चर्चेही जोर धरीत आहे. गेल्या काही दिवसांपासून यावरून राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक चकमकी झडताना दिसून येत आहे. याच मुद्याना हात लावत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला टोला लगावताना झोपेच्या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या मुद्यावर एका वृत्त वाहिनीशी बोलत होते. पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे. कारण सरकार आता पडेल की नंतर, या भीतीने त्यांना झोप येत नसेल. पण तुम्ही सरकार चालवा, आम्ही ते पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाही, असा टोला पाटील यांनी लगावला. मागासवर्गीय आयोगाचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सात महिन्यांपासून आयोगाचे ऑफिस बंद आहे. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना हे कार्यालय बंद असणे चुकीचे आहे, असं सांगतानाच पाटील म्हणाले, दूध दरवाढीसाठी भाजपाकडून १ ऑगस्टला आंदोलन करणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. रासप, रयत क्रांती, रिपाइं या संघटनाही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आमचं आंदोलन हिसंक नसेल. अधिकार्यांना दूध भेट देणे आणि परवानगी मिळाली, तर देवाला दूध अर्पण करणे, असं आंदोलनाचे स्वरूप असेल, अशी माहिती पाटील यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच दूधाच्या दरावरून चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर टीका केली होती. राज्यात दुधाला सध्या २२ रुपये इतका दर मिळत आहे. २२ रुपये इतक्या साध्या रकमेतून मुलभूत खर्चही भागवणे शेतकर्यांसाठी अडचणीचे झाले आहे. राज्यात लॉकडाउन होण्याआधी दुधाला साधारण ३२ रुपये इतका दर मिळत होता. मात्र तरीही आता कोणीही कुठेही निषेध करताना दिसत नाही. असं चंद्रकांत पाटील म्हणाले.  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार