सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*सुपर 30 चे आनंद कुमार यांचा नागपुरातील तरुणांशी संवाद २२ ला*

बुधवार 22 रोजी सायंकाळी 6 वाजता सुपर 30 च्या नावाने प्रसिद्ध तसेच रामानुज स्कुल ऑफ मोथोमयटिक्सचे संस्थापक प्रा. आनंद कुमार यांचे फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून युवा संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Snehal Joshi
  • Jul 20 2020 10:13PM
नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व भाजप शिक्षक सेल च्या वतीने बुधवार 22 रोजी सायंकाळी 6 वाजता सुपर 30 च्या नावाने प्रसिद्ध तसेच रामानुज स्कुल ऑफ मोथोमयटिक्सचे संस्थापक प्रा. आनंद कुमार यांचे फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून युवा संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. नाचिकेता पुरस्कार प्राप्त आनंद कुमार यांनी सुपर 30 संकल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभिनव पद्धतीने त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठीची दिशा दाखवली. त्यानंतर आजपर्यंत देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना आनंद कुमार यांच्या प्रेरणेने भविष्यातील आव्हानांना समोर जाण्यास मदत झाली. हृतिक रोशन ह्यांचा सुपर 30 हा चित्रपट सुद्धा आनंद कुमार ह्यांच्या जीवनावर आधारित होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या तरुणांपुढे नवीन आवाहने आहेत. शाळा कॉलेजेस बंद आहेत. बरेच विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. नुकतेच 10 वी आणि 12वी चे निकाल लागले आहेत. आपल्या भावीतव्याबाबत त्यांचेही बरेच प्रश्न आहेत. म्हणून विद्यार्थ्यांच्या अश्या प्रकारच्या अनेक प्रश्नांचे समाधान करण्याच्या दृष्टीने प्रा. आनंद कुमार नागपुरातील युवकांशी संवाद साधणार आहे. BJP4Nagpur आणि BJYMNagpur ह्या फेसबुक पेज मध्ये होणाऱ्या या संवादसत्राचे प्रास्ताविक युवा मोर्चा च्या अध्यक्षा शिवानी दाणी वखरे करणार आहेत. नागपूर हुन या कार्यक्रमात भाजप शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके व महापौर श्री संदीप जोशी सम्मिलीत होणार आहेत. सदर कार्यक्रमामध्ये नागपुरातील हजारो युवकांनी भाग घ्यावा असे आवाहन आयोजन समितीचे सदस्य कल्पना पांडे, वीरेंद्र कुकरेजा, देवेंद्र दस्तुरे, शिवानी दाणी वखरे, केतन मोहितकर व कल्याण देशपांडे यांनी केले आहे. सदर लाईव्ह मध्ये सम्मिलीत होण्याकरिता खालील लिंक वर नोंदणी केल्या जाऊ शकते. https://rb.gy/uqcan7

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार