सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतकर्‍यांना बोगस बियाण्यांची विक्री ; कृषी विभागाने केली कारवाई

करोना संकट, टोळधाड आणि आता शेतकऱ्यांची एक वेगळीच लूट. ज्या बियाण्यांची परवानगी नाही. अशा बियाण्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून त्यातून शेतकऱ्यांना नुकसान होत आहे.

Snehal Joshi
  • Jun 7 2020 10:33AM
नागपूर --- करोना  संकट, टोळधाड आणि आता शेतकऱ्यांची  एक वेगळीच लूट. ज्या  बियाण्यांची परवानगी नाही. अशा    बियाण्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून त्यातून शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. आणि अशा बियाण्यांची विक्री  होत असल्याची माहिती मिळताच नरखेड तालुक्या तील कृषी विभागाने फरारी पथक पोलिसांच्या मदतीने धाड घालून कारवाई केली आहे. या धडक कारवाई मध्ये  कपासाच्या बोगस बियाण्यांची विक्री  करणाऱ्या  व्यक्तीला पकडले आहे. 

 नरखेड तालुक्यातील कृषी विभागाला शेतकऱ्यांकडून माहिती मिळाली होती कि  तालुक्यातील घोगरा येथील विनायक वसंतराव मोहरिया (57) हे शेतकऱ्यांना त्याच्या घरून कपाशीचे बोगस बियाण्यांची विक्री करत असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांचे पाकीट  आहेत.  यानंतर तालुका कृषी अधिकारी डॉ.योगीराज जुमडे    नरखेडचे कृषी मंडळ अधिकारी सोपान लांडे, 
भारसिंगीचे मंडळ कृषी अधिकारी कुणाल ठाकूर यांनी याची माहिती जलालखेडा पोलिसांना दिली. पोलीस हवालदार भिमराव भटकर व पोलीस शिपाई अरविंद जाधव यांना घेऊन कृषी विभागाचे पथक हे घोगरा येथील विनायक वसंतराव महोरिया  यांच्या घरी गेल्या असता आधी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पण त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरातून 103 पाकिटे कपासाचे बोगस बियाणे आढळून आले. हे पाकीट शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे बील न देता प्रति पाकीट हजार रुपयाच्या दराने विकत होता. त्यामुळे जप्त केलेल्या पाकिटाची किंमत 1,03,000 रुपये असून हा माल जप्त करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. जलालखेडा  पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.  पुढील तपास जलालखेडा पोलीस व कृषी विभाग करीत आहे.

 तालुका कृषी अधिकारी नरखेड डॉ. योगीराज जुमडे यांनी सुदर्शन शी बोलताना सांगितले की. जा बियाण्यांची परवानगी आहे. अशा बियाण्यांची शेतकऱ्यांनी खरेदी करून पावती घ्यावी. जेणे करून पुढे काही नुकसान झाले तर त्याला न्याय मिळू शकेल. अशा बोगस बियाण्यांची शेतकऱ्यांनी खरेदी करू नये. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्यांना दाद मिळवता येत नाही. कपाशीचे बोगस बियाण्यांची उत्पादकांत पासून तर लागवड करे पर्यंत सर्व जण दोषी असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणांची  पेरणी करावी. आणि अशा बियाण्यांची विक्री  होत असल्याची माहिती मिळताच नरखेड तालुक्या तील कृषी विभागाने फरारी पथक पोलिसांच्या मदतीने धाड घालून कारवाई केली आहे. या धडक कारवाई मध्ये  कपासाच्या बोगस बियाण्यांची विक्री  करणाऱ्या  व्यक्तीला पकडले आहे. 

 नरखेड तालुक्यातील कृषी विभागाला शेतकऱ्यांकडून माहिती मिळाली होती कि  तालुक्यातील घोगरा येथील विनायक वसंतराव मोहरिया (57) हे शेतकऱ्यांना त्याच्या घरून कपाशीचे बोगस बियाण्यांची विक्री करत असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांचे पाकीट  आहेत.  यानंतर तालुका कृषी अधिकारी डॉ.योगीराज जुमडे    नरखेडचे कृषी मंडळ अधिकारी सोपान लांडे, 
भारसिंगीचे मंडळ कृषी अधिकारी कुणाल ठाकूर यांनी याची माहिती जलालखेडा पोलिसांना दिली. पोलीस हवालदार भिमराव भटकर व पोलीस शिपाई अरविंद जाधव यांना घेऊन कृषी विभागाचे पथक हे घोगरा येथील विनायक वसंतराव महोरिया  यांच्या घरी गेल्या असता आधी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पण त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरातून 103 पाकिटे कपासाचे बोगस बियाणे आढळून आले. हे पाकीट शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे बील न देता प्रति पाकीट हजार रुपयाच्या दराने विकत होता. त्यामुळे जप्त केलेल्या पाकिटाची किंमत 1,03,000 रुपये असून हा माल जप्त करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. जलालखेडा  पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.  पुढील तपास जलालखेडा पोलीस व कृषी विभाग करीत आहे.

 तालुका कृषी अधिकारी नरखेड डॉ. योगीराज जुमडे यांनी सुदर्शन शी बोलताना सांगितले की. जा बियाण्यांची परवानगी आहे. अशा बियाण्यांची शेतकऱ्यांनी खरेदी करून पावती घ्यावी. जेणे करून पुढे काही नुकसान झाले तर त्याला न्याय मिळू शकेल. अशा बोगस बियाण्यांची शेतकऱ्यांनी खरेदी करू नये. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्यांना दाद मिळवता येत नाही. कपाशीचे बोगस बियाण्यांची उत्पादकांत पासून तर लागवड करे पर्यंत सर्व जण दोषी असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणांची  पेरणी करावी.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार