सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मातोश्रीची सुरक्षा वाढवली

दुबईहून अज्ञात व्यक्तीने 4 फोन कॉल काल रात्री 11 च्या सुमारास मातोश्रीच्या लँडलाईनवर केले होते.

Aishwarya Dubey
  • Sep 6 2020 7:34PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानावर काल रात्री 11 च्या सुमारास दुबईवरून अज्ञान व्यक्तीने फोन करून धमकी दिली आहे. उद्धव ठाकरे यांना ठार मारू आणि मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. दुबईहून अज्ञात व्यक्तीने 4 फोन कॉल काल रात्री 11 च्या सुमारास मातोश्रीच्या लँडलाईनवर केले होते.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणारी व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? दुबईहून मातोश्रीवर लँडलाईनला फोन कॉल कोणी केले आहेत? याचा आता तपास आता राज्य गुप्तचर विभाग आणि सर्व सुरक्षा यंत्रणा करत आहेत. मातोश्रीवर आलेल्या फोन धमकीनंतर मातोश्री निवास्थानाची आणि ठाकरे कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

कोरोना संसर्गामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पोलीस सुरक्षा कमी केली होती. मात्र आता दुबईहून आलेल्या धमकीच्या फोन कॉलनंतर ठाकरे कुटुंबाची पुन्हा सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

धमकीबाबत ठाकरे सरकारमधील मंत्र्यांची प्रतिक्रिया

'राजकारण कोणत्या स्तराला जात आहे याचं लक्षण आहे. धमकी द्यायची हिंमत केली. महाराष्ट्राची जनता आणि आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहोत. कोणी त्यांना बोट लावू शकणार नाही,' असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'सध्या जे राजकीय वातावरण तयार करत आहे. ज्या वेळी दाऊदला आणणार मुसक्या वळणार सांगितलं त्यानंतर हे होत आहे. केंद्रात इतकं मजबूत सरकार असताना मातोश्री उडवण्याची भाषा करण्यात आली आहे. याची चौकशी केंद्र सरकारने केली पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे,' असं वडेट्टीवार म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार