सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पालघर जिल्ह्यात आता होणार प्लाझ्मा थेरपी द्वारे उपचार प्लाझ्मा दान करण्यासाठी दात्यांनी पुढे यावे

प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून कोव्हीड 19 चा रुग्ण पूर्ण पणे बरा होऊ शकतो या थेरपी सेंटरला पालघर जिल्ह्यात परवानगी मिळण्यासाठी

Aishwarya Dubey
  • Jul 11 2020 12:46PM
पालघर  :   प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून कोव्हीड 19 चा  रुग्ण पूर्ण पणे बरा होऊ शकतो या थेरपी सेंटरला पालघर जिल्ह्यात  परवानगी मिळण्यासाठी    प्रयत्न सुरू होते.या प्रयत्नाला यश मिळाले असुन प्लाझ्मा थेरेपीचा वापर करणाऱ्या जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्याचा समावेश झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. 
 नालासोपारा येथील    साथिया ट्रस्ट पेढीचे  अध्यक्ष विजय महाजन यांनी जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे,  व  जिल्हा शल्य चिकित्सक,डॉ. .कांचन वानेरे, यांची भेट घेऊन साथिया ट्रस्ट रक्त पेढीला प्लाझ्मा अँफेरेसीस ची परवानगी मिळाली असल्या बाबतची माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे, यांच्या मार्गदर्शनामुळे व प्रयत्नामुळे पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील प्लाझ्मा थेरेपीचा वापर करणाऱ्या मोजक्या जिल्ह्यापैकी एक जिल्हा ठरणार आहे. आता पालघर जिल्ह्यामध्ये कोविड-१९ च्या रुग्णांना प्लाझ्मा थेरेपी देणे शक्य होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कोविड-१९ बाधित रुग्ण जे पूर्णतः बरे झाले आहेत त्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. जास्तित जास्त प्लाझ्मा दात्यांनी पुढे येऊन कोविड-१९ च्या रुग्णांना जिवनदान देऊन कोरोना रुग्णाला वाचवण्याचे मोठे काम यातून घडू शकते, असा विश्वास व्यक्त करून यासाठी  विजय महाजन भ्र.क्र. ९०२८६४१८८६ यांना संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार