सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदावर आशुतोष काळे यांची निवड करण्यात आली

देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान असलेल्या श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या नेमणुकीचा तिढा अखेर २१ महिन्यांनंतर सुटला.

Sudarshan MH
  • Sep 18 2021 1:19PM

राहाता: शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाची राज्य सरकारकडून गुरुवारी रात्री उशिरा घोषणा झाली. यानुसार आमदार आशुतोष काळे यांची संस्थानच्या अध्यक्षपदावर निवड करण्यात आली आहे. दरम्यान, अध्यक्ष काळे यांच्यासह अकरा सदस्यांनी शुक्रवारी शिर्डीत येत पदभार स्वीकारला.

राज्य सरकारने काल रात्री उशिरा साईसंस्थानच्या १७ विश्वस्तांपैकी १२ जणांची यादी जाहिर केली. आज शुक्रवारी या १२ सदस्यांपैकी अध्यक्षांसह ११ सदस्यांनी शिर्डीत येऊन साईमंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले. तसेच नंतर कार्यालयात जात पदभार स्वीकारला. काळे यांच्यासह नगराध्यक्ष तथा पदसिद्ध विश्वस्त शिवाजी गोंदकर, महेंद्र शेळके, सुरेश वाबळे, सुहास आहेर, सचिन गुजर,अनुराधा आदीक,डॉ एकनाथ गोंदकर,अविनाश दंडवते,राहुल कनाल, जयंत जाधव यांचा पदभार स्वीकारणाऱ्यांमध्ये सहभाग होता.

देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान असलेल्या श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या नेमणुकीचा तिढा अखेर २१ महिन्यांनंतर सुटला. यामध्ये संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद सेनेकडे आले. यानुसार उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नेमणूक झालेली आहे. मात्र पदभार स्वीकारण्यास आज ते अनुपस्थित होते. या मुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. मागील विश्वस्त मंडळात देखील सेनेचे सर्व सदस्य सतत गैरहजर राहिल्याने पुढे ते अपात्र ठरले होते. त्यामुळे आता शिवसेनेची या विश्वस्त मंडळाबाबतची पुढील भूमिका काय असणार याकडे लक्ष वेधले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार