सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दख्खनच्या राजाची यात्रा रद्द होण्याची शक्यता

यावर्षीही दख्खनच्या राजाची यात्रा रद्द होण्याची शक्यता आहे. सरकारने कडक निर्बंध लागू केल्यानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Sudarshan MH
  • Apr 5 2021 11:48AM

यावर्षीही दख्खनच्या राजाची यात्रा रद्द होण्याची शक्यता आहे. सरकारने कडक निर्बंध लागू केल्यानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो. यामुळे सलग दुसऱ्या वर्षी जोतिबाची चैत्र यात्रा रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावर्षीही कोरोनाच्या संकटामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती, याहीवर्षी कोरोनाचं सावट कायम आहे.

17 एप्रिल रोजी ही यात्रा असणार आहे, मात्र महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. ते लक्षात घेता यावर्षीही जोतिबाची चैत्र यात्रा रद्द होऊ शकते. दरम्यान जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समिती लवकरच याबाबत त्यांची भूमिका जाहीर करती. गेल्यावर्षी ही यात्रा लॉकडाऊनमुळे रद्द झाली होती. दरवर्षी लाखो भाविक याठिकाणी दाखल होतात.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी गेल्यावर्षी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्या दरम्यान असणारी श्री क्षेत्र जोतिबा डोंगरची चैत्र यात्रा रद्द करण्यात आली होती. या यात्रेसाठी साधारण 8-9 लाख भाविक जोतिबा डोंगरावर येतात. मात्र ही यात्रा रद्द झाल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसला होता. यावर्षीही या यात्रेवर कोरोनाचे संकट आहे. पुजारी, ग्रामस्थ, भाविक यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते, पण कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कामदा एकादशीला सुरू होणारी ही यात्रा गाव भंडारा झाल्यानंतर समाप्त होते.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार