सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्वत:च मीटर रिडींग घेऊन विज बिल भरा... ऊर्जामंत्री

वीज वापराचं मीटर रिडींग मोबाईल अॅपद्वारे घ्या आणि वीजबिल भरा असं आवाहन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील नागरिकांना केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या 'ब्रेक दि चेन'च्या निर्बंधांमुळे हे आवाहन करण्यात आले आहे.

Snehal Joshi. MH
  • Apr 7 2021 3:49PM
 
 
 
 
राज्यात वीज बिलाचा मुद्दा मागील वर्षभरापासून चांगलाच तापला आहे. म्हणून राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील जनतेला अतिशय महत्त्वाचं आवाहन केलं आहे. वीज वापराचं मीटर रिडींग मोबाईल अॅपद्वारे घ्या आणि वीजबिल भरा असं आवाहन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील नागरिकांना केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या 'ब्रेक दि चेन'च्या निर्बंधांमुळे वीज कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या वीज वापराचं प्रत्यक्ष रिडींग घेण्यावर निर्बंध येणार आहेत, याच पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांनी हे आवाहन केलं आहे. महावितरणनंही वीज ग्राहकांच्या तक्रारी तातडीनं सोडवाव्यात, त्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी यासाठीची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. 
ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडवण्यासाठी ग्राहक निवारण यंत्रणेला अलर्ट राहण्याचे निर्देशही राऊत यांनी दिले आहेत. 
मागील लॉकडाऊन काळात जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी चित्र होतं. ज्यामध्ये अनेक ग्राहकांना त्रास झाला. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये आणि ग्राहकांना त्रास होऊ नये, कारण ग्राहक हा आमचा राजा आहे, आमचं दैवत आहे. त्यामुळं ग्राहकांचं हित जोपासणाऱ्या गोष्टींसाठी हातभार लावण आमचं काम आहे, असं नितीन राऊत म्हणाले. 
स्वत:च मीटर रिडींग घेऊन ग्राहकांनी ते संबंधित विभागांना पाठवावं, शिवाय ज्यांची घरं बंद असतील त्यांनी सर्व स्वीच बंद करुनच घराबाहेर पडावं. त्यावेळी बंद केल्यानंतरच्या रिडींगची उर्जा विभागाला माहिती द्यावी, जेणेकरुन पुढं सरासरी आकडेवारी काढण्याची आवश्यकता राहणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं ही यंत्रणा कार्यरत असणार आहे, असं म्हणत नितीन राऊत यांनी जनतेनं आपल्याला सहकार्य करावं असं आवाहन केलं. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार