सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू

अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीने असावा, या विषयी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

Abhimanyu
  • Dec 11 2020 6:03PM

मुंबई : सरकारी कार्यलयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश राज्यसरकारने जाहीर केसे आहेत. राज्याचा कारभार मंत्रालयातुन चालविण्यात येतो, लोकप्रतिनिधी सह सर्वसामान्य नागरिक हे त्यांच्या कामा निम्मित सरकारी कार्यलयात भेट देतात, अशा वेळी राज्यशासनाचे प्रतिनिधी म्हणून सरकारी कार्यलयातील अधिकारी कर्मचारी यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तीमत्वाचा आणि ओळखीचा भाग आहे. मात्र शासकिय कर्मचारी अनूरुप ठरेल अशी वेशभूषा वापर करताना दिसुन येत नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांची जनसामान्यातील प्रतिमा मलिन होते.

शासकीय कर्मचाऱ्यांकडून चांगल्या वागणुकीची तसेच व्यक्तीमत्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते. मात्र अधिकारी, कर्मचारी यांची वेशभूषा अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कामकाजावर देखील होतो. या सर्व गोष्टींचा विचार करता मंत्रालय तसेच सर्व राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीने असावा, या विषयी मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे देण्यात आल्या आहेत.

 

  1. मंत्रालयात आता जीन्स टी शर्ट आता घालता येणार नाही. साडी,सलवार चुडीदार,ट्राउझर पॅन्ट, त्यावर कुर्ता आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव करावा. तर पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर असा पेहराव करावा.
  2. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट यांचा वापर करावा तसेच पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बूट, सॅन्डल याचा वापर करावा.
  3. सरकारी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांनी स्लीपर्स वापरू नये.
  4. गडद रंगाचे चित्र विचित्र नक्षीकाम चित्र असलेले कपडे परिधान करू नये.
  5. आठवड्यातील एक दिवस ( शुक्रवारी) सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे परिधान करावे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार