सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

करोनाची बाधा झालेले सरकारमधील पहिले वरिष्ठ अधिकारी

भारताचे संरक्षण सचिव अजय कुमार यांचा करोना व्हायरसच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ते होम क्वारंटाइन आहेत. अजय कुमार यांना सौम्य ताप आला होता व त्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे आढळली होती.

Aishwarya Dubey
  • Jun 4 2020 9:43AM

भारताचे संरक्षण सचिव अजय कुमार यांचा करोना व्हायरसच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ते होम क्वारंटाइन आहेत. अजय कुमार यांना सौम्य ताप आला होता व त्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे आढळली होती. त्यामुळे टेस्ट करण्यात आली. मंगळवारी त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

करोनाची बाधा झालेले सरकारमधील ते पहिले वरिष्ठ अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले अन्य वरिष्ठ नोकरशहा, लष्करी अधिकारी आणि मंत्री यांची करोना चाचणी झाली का? ते अजून स्पष्ट झालेले नाही. रायसीना हिल्स येथे साऊथ ब्लॉकमध्ये संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय आहे. अजय कुमार यांना करोनाची बाधा झाल्यानंतर ३५ अधिकारी होम क्वारंटाइन झाल्याचे पीटीआयने म्हटले आहे.

संरक्षण मंत्रालयाने अजय कुमार यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु केला आहे. साऊथ ब्लॉकच्या पहिल्या मजल्याचे निर्जतुकींकरण करण्यात आले आहे. पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार