सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पेटीएम हे लोकप्रिय अ‍ॅप्लिकेशन गुगलने आपल्या प्ले स्टोअर प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकले

गुगलने प्ले स्टोअरवरुन अ‍ॅप हटवले

Aishwarya Dubey
  • Sep 18 2020 5:07PM

ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे पेटीएम हे लोकप्रिय अ‍ॅप्लिकेशन गुगलने आपल्या प्ले स्टोअर प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकले आहे. मात्र या कारवाईमुळे हे अ‍ॅप वापरणाऱ्या ४५ कोटी युझर्सच्या पैशांचे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गुगलने केलेल्या कारवाईसंदर्भात पेटीएमने ट्विटवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. हे अ‍ॅप वापरणाऱ्या युझर्सला काळजी करण्याची गरज नसून त्यांचे पैसे सुरक्षित असल्याचे कंपनीने म्हटलं आहे. त्याचप्रमाणे लवकरच आम्ही परत या प्लॅटफॉर्मवर येऊ असं म्हटलं आहे.

पेटीएम या अ‍ॅपच्या माध्यमातून खेळांसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावून जुगार खेळण्याची परवानगी दिली जाते. त्याचप्रमाणे कसिनोसारख्या सेवा पुरवली जाते. हे सर्व गुगलच्या नियमांमध्ये बसणारे नाही असं सांगत गुगलने पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मॉल, पेटीएम मनी याचबरोबर कंपनीच्या अन्य अ‍ॅपवरही कारवाई केली आहे. यावर पहिली प्रतिक्रिया देताना पेटीएमने ट्विटवरुन गुगल प्लेवर आता अ‍ॅप उपलब्ध नसेल असं स्पष्ट केलं आहे. “प्रिय पेटीएम युझर्स, पेटीएमचे अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप्लिकेशन तात्पुरत्या स्वरुपात गुगलच्या प्ले स्टोअवर उपलब्ध नसेल. नवीन युझर्सला डाउनलोड करण्यासाठी तसेच डाऊनलोड केलेल्यांना अपडेट करण्यासाठी सेवा पुरवली जाणार नाही. लवकरच आम्ही परत येऊ. तुमचे सर्व पैसे सुरक्षित आहेत. तुम्ही नेहमीप्रमाणे तुमचे पेटीएम अ‍ॅप वापरु शकता,” असं कंपनीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या प्रकरणामध्ये पेटीएमने चौकशी सुरु केली आहे. चौकशीनंतर कंपनीकडून अधिकृतपणे पत्रकही जारी करण्यात येणार आहे. सध्या पेटीएम हे अ‍ॅप्लिकेशन  फक्त अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर डाऊनलोडसाठी उपलब्ध असेल.

गुगलने का केली कारवाई?

गुगलने पेटीएमवर केलेल्या कारवाईसंदर्भात आपल्या ब्लॉगमध्ये माहिती दिली आहे. लाखो युझर्स असणाऱ्या पेटीएमवर कारवाई करण्यामागे कंपनीने ऑनलाइन जुगारासंदर्भातील नियमांचे कारण दिलं आहे. “आम्ही ऑनलाइन कसिनो किंवा नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावण्यासाठी पुरवण्यात येणारी जुगाराची सेवा देणाऱ्या अ‍ॅपला परवानगी देत नाही. एखाद्या ग्राहकाला आपल्या प्लॅटफॉर्मवरुन बाहेरील वेबसाईटवर ऑनलाइन जुगारासाठी जाण्यास परवानगी देणारी सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या अ‍ॅपचाही यामध्ये समावेश होतो. अशाप्रकारच्या देवाणघेवाणीमधून पैसे तसेच रोख रक्कम बक्षीस म्हणून देणे हे आमच्या नियमांच्या विरोधात आहे,” असं गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

“ज्या गोष्टींमुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते अशा गोष्टींपासून आमच्या युझर्सचे संरक्षण व्हावे असे आमचे नियम आहेत. एखाद्या अ‍ॅपने याचे उल्लंघन केल्यास आम्ही त्यासंदर्भातील नियमांची माहिती अ‍ॅपच्या डेव्हलपर्सला देतो. यासंदर्भातील इतर कायदेशीर माहिती आणि नियम अ‍ॅप निर्माण करणाऱ्या कंपन्यांना सांगितली जाते. मात्र अनेकदा सांगितल्यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अ‍ॅपवर आम्ही कारवाई करतो. यासंदर्भात आम्ही या कंपनीचे गुगल प्ले डेव्हपर अकाऊंट बंद करण्यासारखी गंभीर कारवाईही करु शकतो. आपल्या प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या सर्व डेव्हलपर्सला हे नियम लागू होतात,” असं गुगलने म्हटलं आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार