सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोनाने छत्र हरपलं, पण वसई-विरार महापालिका ठरणार आधारवड - आमदार हितेंद्र ठाकूर यांची कल्पकता - कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना आधार - महापालिकेकडून अनाथ मुलांना अनुदान

वसई विरार - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा पहिल्या लाटेपेक्षा तीव्र आहे. या लाटेत अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Sudarshan MH
  • May 29 2021 4:16PM


वसई विरार - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा पहिल्या लाटेपेक्षा तीव्र आहे. या लाटेत अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय असून त्यामुळे अनेक लहान मुलांनी आपले पालक गमावले आहेत. वसई-विरारमधील अशा लहान मुलांची जबाबदारी घेऊन त्यांचं भविष्य सांभाळण्यासाठी वसई-विरार महापालिका पुढे सरसावली आहे. कोरोनामुळे डोक्यावरील मायेचं छत्र हरवलेल्या या बालकांना महापालिका एक ठरावीक रक्कम अनुदानापोटी दरवर्षी देणार आहे. बहुजन विकास आघाडीची सत्ता असलेल्या पालिकेच्या या उपक्रमामागे ‘बविआ’चे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांची कल्पकता आहे.

कोरोनाच्या कठीण काळात वसई-विरार महापालिका हद्दीतील लोकांसाठी बहुजन विकास आघाडीने पडेल ती मदत केली आहे. मोफत अन्नधान्य व जेवण पुरवण्यापासून ते निर्जंतुकीकरणापर्यंत विविध आघाड्यांवर बहुजन विकास आघाडीने लोकांना आधार दिला. रुग्णांच्या औषधोपचारांपासून रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय करेपर्यंत विविध पातळ्यांवर बहुजन विकास आघाडी सक्रीय आहे.

याच दरम्यान सेलेब्रिटी सोनू सूद यांनी कोरोनामुळे अनाथ झालेल्या किंवा आई-वडिलांपैकी एक गमावलेल्या मुलांच्या शिक्षणाचा आणि पालनपोषणाच्या प्रश्नाला वाचा फोडली. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनाही हा प्रश्न सतावत होताच. त्यांनी आमदार क्षितीज ठाकूर, माजी महापौर प्रविण शेट्टी यांच्याशी चर्चा करत अशा बालकांसाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला वसई-विरार महापालिकेची साथ लाभल्यानंतर प्रशासकीय पातळीवरूनही या योजनेला पाठबळ मिळालं.

कोरोना काळात सर्वात जास्त नुकसान या लहान मुलांचं झालं आहे. त्यांच्या शिक्षणाचा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न तर आहेच, पण अनेक लहान मुलांच्या घरातील कर्ता पालक किंवा दोन्ही पालकांचे मृत्यू झाले आहेत. त्यांच्या भविष्याचा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे. आम्ही या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही. ती मुलं आता बहुजन विकास आघाडीची जबाबदारी आहेत. या विचारातूनच महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आणि पालिका आयुक्त सतीश  लोखंडे यांनीही आमची भावना समजून घेत एक ठोस योजना आखली, असं आमदार क्षितीज ठाकूर यांनी सांगितलं.

आता वसई-विरार महापालिका बहुजन विकास आघाडीच्या मदतीने या अनाथ मुलांना वार्षिक २४ हजार रुपयांचं अनुदान देणार आहे. हा निधी या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करता येईल. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना अशा प्रकारे अनुदान देणारी वसई-विरार महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे.

या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाबरोबरच त्यांना नवीन कुटुंब मिळू शकेल काय, याचीही चाचपणी करता येणार आहे. त्यादृष्टीनेही बहुजन विकास आघाडी प्रयत्न करणार असल्याचं माजी महापौर प्रविण शेट्टी यांनी सांगितलं. मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी त्यांना सकस आहार, त्यांच्याभोवती आनंदी वातावरण आणि त्यांचं समुपदेशन या गोष्टींवर भर दिला जाईल, असं शेट्टी म्हणाले.

कोणत्याही परिस्थितीत आमची मुलं एकाकी पडणार नाहीत, हे आमचं त्यांच्या पालकांना वचन आहे, असं आमदार क्षितीज ठाकूर यांनी सांगितलं.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार