सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दोंडाईच्यात गिरधारीलालकडे भरदिवसा एक लाखाच्या साहित्याची चोरी

दोंडाईचा - येथील गबाजी नगरमध्ये राहणारे श्री गिरधारीलाल रमेश भामरे (४०) यांच्या राहत्या घरी कोणी नसल्याची संधी साधत,चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या वस्तुसह,

Nandurbar MH
  • Jun 29 2021 12:45PM


*दोन लाकडी दरवाजे तोडत धाडसी चोरी,रहिवासी एरियात घटना झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचा विषय...*

दोंडाईचा - येथील गबाजी नगरमध्ये राहणारे श्री गिरधारीलाल रमेश भामरे (४०) यांच्या राहत्या घरी कोणी नसल्याची संधी साधत,चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या वस्तुसह,रोकड एक लाखापर्यंतच्या साहित्याची धाडसी चोरी केली आहे. तसेच भरवस्तीत आजुबाजूला रहिवासी लोक राहिल्यावरही चोरांनी चोरीच्या घटनेला लक्ष केल्याने आजुबाजूच्या लोकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.

याबाबत गिरधारीलाल भामरे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी वरील ठिकाणी पत्नी निता,एक मुलगा आदित्य,एक मुलगी ज्ञानेश्वरी आदींसह एकत्र राहतो.तसेच वलवाडी शिवारात शेतजमीन असुन ती करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो व रामबोरीस परिसरात किरकोळ कपाशी खरेदी करून मोठ्या व्यापारींकडे विकतो.

दिनांक २६ जुन २०२१ शनिवार रोजी सकाळी ९.०० वाजता माझ्या घराच्या दोन्ही दरवाज्यांना कुलूप लावून, खाजगी वाहनाने मी माझ्या पुर्ण परिवारसह नांदगाव ता.जि.नासिक येथे लग्नसमारंभनिमित्त गेलो होतो. तसेच तेथुन दुसऱ्या दिवशी माझी पत्नीची आजी हिचा कळवण येथे दशक्रिया विधी असल्याने रात्री मुक्कामी आलो व दशक्रिया विधी आटोपून आम्ही दिनांक २७ जुन २०२१ रात्री ९.०० वाजेच्या सुमारास आमच्या दोंडाईचा येथील गबाजी नगरमधील घरी पोहचलो. तेव्हा आम्ही गेटचे कुलूप उघडून आत गेलो.तेव्हा घराच्या लाकडी दरवाज्याचे कुलूप खाली तोडलेल्या अवस्थेत होते.मी घाबरलेल्या अवस्थेत शेजारी राहणाऱ्या लोकांना आवाज दिला. ते ही धावपळ करून माझ्याजवळ आले.तेव्हा मी त्यांना विचारले की,तुम्ही माझ्या घरी कोणाला येताना-काही घेऊन जाताना पाहिले का? तेव्हा त्यांनी नाही उत्तर दिले. मी घरात प्रवेश केला असता,मला माझ्या बेडरूममधील लोखंडी कपाटाचे कुलूप तुटून, सामान अस्तव्यस्त दिसला.त्यावेळी माझ्या कपाटातील  (४००००/) चाळीस हजार रूपये किमंतीचे एक  चार तोळे वजनाची सोन्याची मंगळपोत, (२००००/) वीस हजार रुपये किमंतीचे एक दोन तोळे वजनाचा नेकलेस, (४०००/) चार हजार रुपये किमंतीचे आठ ग्रँम वजनाचे सोन्याचे कानातील टोंगल, (१५०००/) पंधरा हजार रुपये किमंतीचे तीन किलो वजनाचे चांदीचे दागिने, त्यात कडे-पाटल्या वाळ्या-वेल्या, (५०००/) पाच हजार रुपये किमंतीचे एक तोळे वजनाची सोन्याची चेन,व स्वयपाक घरात स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेले (२००००/) वीस हजार रुपये रोख असा एकूण (१०४०००/) एक लाख चार हजार रुपये किमंतीचा सोन्या-चांदीच्या दागिंन्यासह रोख रक्कम मुद्देमाल अज्ञात चोरांनी चोरून नेला आहे.चोरीस गेलेल्या दागिण्यांची खात्री करून मी आज रोजी दोंडाईचा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

तसेच सदर गबाजी नगर म्हणजे गावातील सुसज्ज रहिवासी एरिया आहे. ऐवढ्या रहिवासी एरियात दिवसाढवळ्या चोरी होणे म्हणजे शेजारील लोकांनाही धक्काच बसला आहे. अशा पद्धतीने चोर बंद घराचे कुलूप तोडून साफसफाई करत असतील तर प्रत्येक नागरिककांने बाहेर गावी जाताना घरी कमीत कमी एखाद व्यक्तीला तरी देखरेखसाठी सोडून जाणे आवश्यक आहे, असे एकंदरीत समाजमन चोरीच्या घटनेच्या चिंतेतुन सुर निघत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार