सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नांदेडच्या हदगाव येथील एकाच कुटुंबातील तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू; तर दोघे बेपत्ता एकाच कुटुंबातील तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची

तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची

Sudarshan MH
  • Oct 2 2020 10:45AM
नांदेडच्या हदगाव येथील एकाच कुटुंबातील तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू; तर दोघे बेपत्ता
एकाच कुटुंबातील तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर दोघे अद्यापही बेपत्ता आहेत. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे ही घटना घडली आहे. आत्महत्या, घात की अपघात याचा तपास करण्याचे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.

नांदेड - जिल्ह्यातील हदगाव येथील सुप्रसिद्ध किराणा दुकानाचे व्यापारी प्रविण वल्लमसेठवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हदगाव शहरात प्रविण उर्फ नितीन वल्लमसेठवार यांचे प्रशांत ट्रेडींग कंपनी या नावाने किराणाचे होलसेल दुकान आहे. त्यांचे दुकान गेल्या पाच ते सहा दिवसापासून बंद असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. बुधवारी व गुरुवारी वेगवेगळ्या परिसरात वल्लमसेठवार कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यात इस्लामपूर परिसरातील पैनगंगा नदीत प्रविण भगवान वल्लमसेठवार (वय-42) यांचा मृतदेह सापडला. तर त्यांची पत्नी अश्विनी यांचा मृतदेह विदर्भातील दराटी (ता.उमरखेड) येथे सापडला. मुलगा सिद्धेश (वय-12) याचा मृतदेह बिटरगाव (ता.उमरखेड) येथे आढळला आहे. सदरील मृतदेहांची ओळख पटली असून त्यांच्या सेजल (वय-२०) व समीक्षा (वय-१३) या दोघी अद्याप बेपत्ता आहेत. वल्लमसेठवार कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूचे कारण सध्या स्पष्ट झाले नाही. त्यामुळे आत्महत्या, घात की अपघात? याचा तपास करण्याचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार