सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा कहर आज 332 रुग्ण

नांदेड दि.8(अरविंद जाधव)| मागील पूर्ण आठवडाभर

Sudarshan MH
  • Sep 9 2020 11:22AM
कोरोना विषाणू चा कहर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 332 नवीन रुग्ण वाढवले आहेत.तर  ४ जन मरण पावले आहेत. कोरोना बाधितांमध्ये 2 महिला आणि 2 पुरुष आहेत. त्यातील एका रुग्णाचा मृत्यू 4 सप्टेंबर रोजी झाला आहे. त्याची नोंद आजच्या 8 सप्टेंबरला माहितीत देण्यात आली आहे.

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेले माहितीनुसार गेल्या 24 तासात जिल्हा रुग्णालयात आणि सरकारी रुग्णालयात आणि मुखेड कोविड सेंटरमध्ये 2 पुरुष आणि 2 महिला रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात सावरमाळ ता.मुखेड येथील 62 वर्षीय महिला आहेत.यांचा मृत्यू 4 सप्टेंबर रोजी झालेला आहे.पण मुखेड ते जिल्हा ठिकाणी हि माहिती येण्यास तब्बल चार दिवस लागले आहेत.पेठवडज कंधार येथील 62 वर्षीय पुरुष,गोकुळनगर नांदेड येथील 77 वर्षीय पुरुष आणि गोपालचावडी येथील 23 वर्षीय महिला अश्या 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोना बाधेने मरण पावणाऱ्यांची संख्या 276 झाली आहे.

मुखेड -12, देगलूर-2, किनवट -6, बिलोली -1, पंजाब भवन -162, जिल्हा रुग्णालय-2, नायगाव-11, कंधार-1, सरकारी रुग्णालयविष्णुपुरी-11, हदगाव-3, लोहा-38,अर्धपार-10, मुदखेड-8, खाजगी रुग्णालय-3, औरंगाबाद येथे पाठवलेले-12, हॆद्राबाद येथील-1, अशा एकूण 283 रुग्णांची उपचारानंतर बरे झाले म्हणून त्यांना सुट्टी झाली आहे. त्यामुळे 6117 झाली आहे.उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण 66.15 टक्के आहे.

आज प्राप्त झालेल्या 1523 अहवालांमधील 1137 अहवाल निगेटीव्ह आहेत, 332 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे आज एकूण रुग्ण संख्या 9578 एवढी झाली आहे. आज प्राप्त झालेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये 89 आणि अँटीजेन तपासणीमध्ये 243 असे एकूण 332 रुग्ण आहेत. आजच्या 332 रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण नांदेड मनपाक्षेत्रात 148 आहेत. आज 588 स्वॅब तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब 21 आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब 12 आहेत.

आज प्राप्त झालेल्या आरटीपीसीआर तपासणीत मनपा क्षेत्र-44, लोहा-1, मुखेड-1,कंधार-3,हदगाव-1, उमरी-1,हिंगोली-1, निजामबाद-1,अर्धापूर-1.देगलूर-2,हिमायतनगर-1,किनवट-23,नांदेड ग्रामदिन-7,नायगाव-1,परभणी-1 असे 89 रुग्ण आहेत. आज प्राप्त झालेल्या ऍन्टीजेन तपासणीमध्ये मनपा क्षेत्र- 104, कंधार-10, मुदखेड-14, मुखेड-20, लोहा-3, नांदेड ग्रामीण-14,नायगाव-22, माहूर-3,उमरी – 4,धर्माबाद – 7,किनवट -11,हदगाव -4, बिलोली-21,देगलुर-2,[परभणी-2,यवतमाळ-2,असे 243 रुग्ण आहेत.

आज कोरोनाने 3129 ऍक्टीव्ह कोरोना बाधित रुग्ण शासकीय रुग्ण विष्णुपूरी-266, पंजाब भवन आणि एनआरआय निवास आणि स्वतःच्या घरी -1352, जिल्हा रुग्णालय-83, नायगाव-94, बिलोली-78, मुखेड-122, देगलूर-61, लोहा-111, हदगाव-83, भोकर-33, कंधार-54, किनवट-115, अर्धापूर-44, मुदखेड-31, माहूर-76, आयुर्वेदिक शासकीय रुग्णालय-49, धर्माबाद-53, उमरी-52, हिमायतनगर-7, बारड-4, खाजगी रुग्णालय-346, औरंगाबाद-7, निजामाबाद-2, मुंबई-1,हैद्राबाद -4,लातूर- असे उपचार सुरू आहेत. यात अती गंभीर स्वरुपात 36 रुग्ण आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार