सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

औद्योगिक व्यवस्थापनातून औद्योगिक क्षेत्रांमधील रुग्णांसाठी बोईसर परिसरात 200 बेड चे रुग्णालय निर्माण करावे -जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे

पालघर जिल्ह्यामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव वाढत

Sudarshan MH
  • Aug 27 2020 10:49AM
पालघर : ( मनीष गुप्ता ) पालघर जिल्ह्यामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यांमधून बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रांमध्ये औद्योगिक व्यवस्थापनाच्या मदतीने बोईसर व परिसरामध्ये 200 बेड (DCHC )डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर निर्माण करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली. त्याचबरोबर कांबळगाव ता. पालघर येथील (CCC) कोव्हीड केअर सेंटर चे मजबुतीकरण करणे व टिमा रुग्णालय बोईसर येथील संपूर्ण 40 बेड आयसीयू करण्यात यावे अशा सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
सदर विषयास अनुसरून जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे  यांनी दि. 25 ऑगस्ट रोजी  जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. या  बैठकीत प्रांताधिकारी, सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य वसई, उपायुक्त कामगार बोईसर, उप अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बोईसर, उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर -1 व 2 तसेच विराज प्रोफाइल प्रा. लि. टाटा स्टील प्रा. लि. जेएसडब्ल्यू प्रा.लि., लुपिन लिमिटेड बोईसर, निऑन फाउंडेशन पालघर, आरती ड्रग्स कम्पनी, अध्यक्ष, तारापूर औद्योगिक व्यवस्थापन असोसिएशन (टिमा) इत्यादी सहभागी झाले होते. 
सदरच्या सुविधा निर्माण करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.औद्योगिक व्यवस्थापनाने या सुविधा निर्माण करावयाच्या असून संपूर्ण सहकार्य करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे. त्याच बरोबर औद्योगिक व्यवस्थापनाकडे असणाऱ्या ॲम्बुलन्स कोव्हीड रुग्णांच्या सेवेसाठी बोईसर येथे उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केली.
यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार