सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गादेवी

भक्तांच्या रक्षणासाठी मारक रूप घेऊन अवतरणार्‍या आणि राक्षसरूपी दुर्जनांचा सर्वनाश करणार्‍या श्री दुर्गादेवी विषयीची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखातून करून घेऊया.

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘शक्ती’
  • Oct 17 2020 11:37PM
१. व्युत्पत्ती आणि अर्थ अ. दैत्यनाशार्थवचनो दकारः परिकीर्तितः । उकारो विघ्ननाशस्य वाचको वेदसम्मतः । रेफो रोगघ्नवचनो गश्च पापघ्नवाचकः । भयशत्रुघ्नवचनश्चाकारः परिकीर्तितः ।। अर्थ : दुर्गा शब्दातला ‘द’कार दैत्यनाश हा अर्थ सूचित करतो. ‘उ’कार हा विघ्ननाशाचा वाचक असल्याचे वेदांनी मान्य केले आहे. ‘रफारा’चा (गा वरील रफार) रोगहरण, ‘ग’चा पापनाशन आणि ‘आ’चा भय आणि शत्रू यांचे हनन, असा अर्थ सांगितलेला आहे. आ. दुर्ग नावाच्या दैत्याचा वध केलेला पाहून लोक तिला दुर्गा म्हणू लागले. इ. ‘दुर्गा’मधील ‘दुर्’ म्हणजे वाईट आणि ‘ग’ म्हणजे गमन करणारी, नाहीशी करणारी. वाईटाचा नाश करणारी ती दुर्गा होय. ई. मूळ रूप दुर्गा : ‘पूर्वी निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या देवी अनेक नावांनी पुजल्या जात होत्या. पुराणकारांनी या सर्व देवींना दुर्गा या ठिकाणी एकरूप केले आणि तिला शिवाच्या पत्नीपदावर बसवले.’ २. वैशिष्ट्ये आणि कार्य अ. महिषासुर, चंड-मुंड आणि शुंभ-निशुंभ या बलदंड दैत्यांचा वध करून श्री दुर्गादेवी ही महाशक्ती ठरली अन् तिने सर्व देव आणि मानव यांना अभय दिले. देवांनी स्तुती केल्यावर त्यांना अभय वचन देतांना ती म्हणाली – इत्थं यदा यदा बाधा दानवोत्था भविष्यति । तदा तदाऽवतीर्याहं करिष्याम्यरिसंक्षयम् ।। – मार्कंडेयपुराण, ९१.५१ अर्थ : अशा प्रकारे जेव्हा जेव्हा दानवांकडून (जगाला) बाधा होईल, तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन शत्रूचा क्षय करीन. आ. दुर्गेच्या आधिदैविक स्वरूपाच्या पलीकडे तिचे एक आध्यात्मिक स्वरूपही आहे. त्या स्वरूपात ती भक्तांची माया-मोह निरसून त्यांना ब्रह्मपदावर आरूढ करते. आपल्या या आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन तिनेच स्वमुखाने सांगितले आहे, ते असे – सर्वे वै देवा देवीमुपतस्थुः । काऽसि त्वं महादेवि ।। साऽब्रविदहं ब्रह्मस्वरूपिणी । मतः प्रकृतिपुरुषाऽत्मकं जगच्छून्यं चाऽशून्यं च ।। अहमानन्दाऽनानन्दा विज्ञानाविज्ञाने अहम् । ब्रह्माब्रह्मणी वेदितव्ये ।। – देव्युपनिषद अर्थ : सर्व देव देवीपुढे उपस्थित झाले आणि त्यांनी तिला विचारले, ‘‘हे महादेवी, तू कोण आहेस ?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘मी ब्रह्मस्वरूपिणी आहे. हे प्रकृतीपुरुषात्मक आणि शून्य-अशून्यात्मक जगत मजपासूनच उत्पन्न झाले आहे. आनंद आणि निरानंद मीच आहे. विज्ञान आणि अविज्ञान मीच आहे. जाणण्यास योग्य असे ब्रह्म आणि अब्रह्म मीच आहे.’’ इ. दुर्गेची प्रतिमा म्हणजे राष्ट्रशक्तीचे प्रतिरूपच आहे. राष्ट्राचे शरीर-मनोबल, सर्वांगीण समृद्धी आणि अध्यात्मसंपदा, या तिन्हींचा संयोग त्या प्रतिरूपात झालेला आहे.  ई. दुर्गेची शक्ती ही इच्छा, ज्ञान आणि क्रिया या रूपांनी त्रिविध आहे.  ३. मूर्तीविज्ञान श्री दुर्गादेवी चतुर्भुज, अष्टभुजा, दशभुजा इत्यादी विविध रूपांत असते. ४. नवदुर्गा सृष्टीमध्ये एकूण नवमिती असून प्रत्येक मितीवर एकेक दुर्गादेवीचे आधिपत्य आहे. अशा एकूण नऊ दुर्गा आहेत; म्हणून त्यांना ‘नवदुर्गा’ असे म्हणतात. अ. ‘नऊ’ या आकड्याची वैशिष्ट्ये १. ‘महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ही (शक्तीची) तीन प्रमुख रूपे होत. या प्रत्येक रूपात आणखी दुसरी दोन रूपे प्रविष्ट होऊन तिघींचे त्रिवृत्करण झाले. मग या नऊ रूपांना नवदुर्गा हे नाव मिळाले.’ टीप १. एका मतानुसार स्थितीपेक्षा निर्मितीला जास्त शक्ती लागत असल्याने महासरस्वती ही रजोगुणाशी आणि जीवन सुखाचे जावे, या संदर्भातील महालक्ष्मी ही सत्त्वगुणाशी संबंधित आहे. दुसर्‍या मतानुसार निर्मितीपेक्षा स्थितीसाठी जास्त शक्ती लागत असल्याने (चंचल) महालक्ष्मी रजोगुणाशी आणि ज्ञानदेवता महासरस्वती ही सत्त्वगुणाशी संबंधित आहे. २. ‘शक्तीतंत्रात ‘९’ या अंकाला विशेष महत्त्व आहे. हा अंक शक्तीचे स्वरूप दर्शवतो. दशमानातील तो सर्वांत मोठा अंक होय. तसाच तो पूर्णांकही आहे; कारण नवाची कितीही पट केली, तरी येणार्‍या संख्येतील अंकांची बेरीज नऊच होते. पूर्ण नेहमी पूर्णच असते. यामुळे शक्त्युपासनेत नऊ हे शक्तीचे अंकप्रतीक ठरले आहे. ३. पार्वतीची नऊ रूपे म्हणजे नवधाप्रकृती होय. यांनाच श्री शंकराचार्य नवात्मा प्रकृती म्हणतात. नवधाप्रकृती म्हणजे पंचमहाभूते, मन, चित्त, बुद्धी आणि अहं अशी नऊ तत्त्वे होय. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार