सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*परळी : राख वाहतूक व प्रदूषणाविरुद्ध धनंजय मुंडेंनी उचलला राजदंड!*

परळी औष्णिक विद्युत केंद्रातून बाहेर पडणारी राख, वडगाव येथील साठवण केंद्र

Sudarshan MH
  • Mar 21 2021 11:01AM
 
 
परळी (दि. २०) ---- : परळी औष्णिक विद्युत केंद्रातून बाहेर पडणारी राख, वडगाव येथील साठवण केंद्र ( ash band ) यासह राख वाहतुकीमुळे परळी व परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, या विरुद्ध परळीचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी राजदंड उगारला आहे.
 
औष्णिक विद्युत केंद्रातून बाहेर पडणारी राख परिसरातील वीट भट्ट्यांना मोफत दिली जावी असा नियम आहे, मात्र काहीजण राखेची अवैध साठवणूक करत आहेत. वाहतूक करणारी बरीच वाहने बोगस नंबर प्लेट असलेली असून, राख वाहतुकीच्या बाबतीतील नियम पाळताना दिसून येत नाहीत. पर्यायाने नागरिकांना या वाहतुकीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो तसेच परिसरातील वातावरणावरही राख मिश्रित धुळीचा परिणाम जाणवू लागला आहे.
 
या सर्व बाबींचा विचार करून शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी धनंजय मुंडे यांनी याच्याशी संबंधित औष्णिक विद्युत केंद्र, पोलीस व वाहतूक शाखेतील अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी यांची संयुक्त बैठक घेत याबाबत सक्तीची पाऊले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. 
 
अवैधरित्या साठवणूक केलेले राखेचे साठे जप्त करून त्यावर कडक कार्यवाही करावी, अवैध वाहनांवर जप्ती आणून त्या वाहन धारकांवर कार्यवाही करावी, शहरातून वाहतूक केली जाणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी त्याचबरोबर नियमानुसार वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांनी राख वाहतुकी संदर्भात आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक करावे असे सक्तीचे निर्देश ना. मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
 
या बैठकीस ना. मुंडे यांच्या सह जि. प. गटनेते अजय मुंडे, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, रा. कॉ. तालुकाध्यक्ष लक्ष्मणतात्या पौळ, प.स. सभापती बालाजी मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सूर्यभान मुंडे, औष्णिक विद्युत केंद्राचे सीजीएम श्री आव्हाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, प्रांताधिकारी नम्रता चाटे, नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे, तहसीलदार श्री शेजुळ, गटविकास अधिकारी श्री केंद्रे, नायब तहसिलदार श्री रुपनर, पोलीस निरीक्षक श्री पुर्भे, कदम, संतोष रोडे, चंद्रकांत कराड आदी उपस्थित होते.
 
*रस्त्यावर सांडलेली राख सक्षन मशिन्स ने साफ करावी...*
 
राख वाहतूक करताना वाहनांमधून रस्त्यावर राख बऱ्याच प्रमाणात सांडते, या राखेला सक्षन मशीनच्या साहाय्याने साफ करावे, यासाठी नगर परिषदेची मदत घ्यावी. तसेच सक्षन मशिन्स उपलब्ध करून देण्यासाठी काही प्रमाणात ना. मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान मार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल, तसेच उर्वरित निधी औष्णिक विद्युत केंद्राच्या सामाजिक उत्तर दायित्व निधी (सीएसआर) मधून उपलब्ध करून द्यावा असेही यावेळी बोलताना ना. धनंजय मुंडे म्हणाले.
 
दरम्यान राख वाहतूक करताना राख ओली करून व त्यावर कपडा झाकून ठेवावा असा नियम आहे परंतु असे करताना वाहनधारक दिसत नाहीत, त्यामुळे परळीकर नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो आहे. याचाच विचार करत धनंजय मुंडे यांनी याकडे गांभीर्याने पाहत राजदंड उगारला आहे, यामुळे राख वाहतूक नियंत्रणात येईल व प्रदूषणापासून स्थानिक नागरिकांची मुक्तता होईल अशा आशा पल्लवित झाल्या आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार