सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी; ‘ती’ चूक सुधारली, पारंपरिक पद्धतीने रोषणाई

रायगड: किल्ले रायगडावर होऊ घातलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Sudarshan MH
  • Jun 6 2021 10:07AM

रायगड: किल्ले रायगडावर होऊ घातलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. गेल्यावर्षी शिवजयंतीच्या दिवशी रायगडावर करण्यात आलेल्या रोषणाईवरुन वाद उद्भवला होता. ही रोषणाई शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फंडातून करण्यात आली होती. मात्र, या डिस्को पद्धतीच्या रोषणाईवर संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला रायगडावर पारंपरिक रोषणाई करण्यात आली आहे. 

दरम्यान, आज संभाजीराजे छत्रपती किल्ले रायगडावरुन मराठा आरक्षणासंदर्भात एखादी महत्वपूर्ण घोषणा करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संभाजीराजे यांनी राज्य सरकारपुढे पाच प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले होते. या मागण्या 5 जूनपर्यंत पूर्ण करण्यात याव्यात, असेही संभाजीराजे यांनी बजावले होते. मात्र, राज्य सरकारने अद्याप सर्व मागण्या मार्गी लावलेल्या नाहीत. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घेणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार