सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

31 डिसेंबरनिमित्त केल्या जाणाऱ्या अपप्रकारांना प्रतिबंध घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

नंदुरबार :- 31 डिसेंबर निमित्त ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या ठिकाणी होणाऱ्या पार्ट्या आणि सार्वजनिक मद्यपान धूम्रपानावर प्रतिबंध आणावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज करण्यात आली.

Nandurbar MH
  • Dec 15 2020 4:16PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार - 31 डिसेंबर निमित्त ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या ठिकाणी होणाऱ्या पार्ट्या आणि सार्वजनिक मद्यपान धूम्रपानावर प्रतिबंध आणावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज करण्यात आली.
 हिंदू जनजागृती समितीचे  प्राध्यापक डॉक्टर सतीश बागुल यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांना तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सादर केले. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यावतीने स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी निवेदन स्वीकारले. त्याप्रसंगी राहुल मराठी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
 या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रध्वज,  राष्ट्रीय प्रतीके,  राष्ट्रीय मानचिन्ह यांची विटंबना होऊ नये  देवतांची विटंबना होऊ नये  फटाक्याच्या माध्यमातून  ध्वनी आणि वायू प्रदूषण  करू नये अशा विषयांवर हिंदू जनजागृती समिती गेल्या अठरा वर्षांपासून जागृतीचे कार्य करीत आहे. सध्यास्थितीत कोरोना  प्रसाराची भीती कायम असून दुसरी लाट येण्याची शक्यता सांगितली जात आहे.  वैश्विक महामारी च्या या काळात फटाक्यांच्या माध्यमातून होणारे प्रदूषण परवडणारे नाही कारण त्यामुळे श्वसनाचे त्रास वाढून कोरोनाचा धोका वाढू शकतो. म्हणून 25 डिसेंबर, 31 डिसेंबर किंवा 1 जानेवारी निमित्त केले जाणाऱ्या  सर्वजनिक सेलिब्रेशनवर बंदी आणावी. सार्वजनिक ठिकाणी केल्या जाणाऱ्या मद्यपान,धुम्रपानावर  प्रतिबंध आणावे.  31 डिसेंबर निमित्त गड किल्ले ऐतिहासिक स्थळी किंवा पर्यटन स्थळी गर्दी करण्यावर तसेच पार्ट्यांचे आयोजनावर बंदी घालणारा आदेश काढावा,  अशी मागणी या निवेदनातून हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार