सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या दुर्गोत्सवात उद्या फुलचंद कराड यांच्या हस्ते देवीची स्थापना

मंगळवार पासून होणार सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात

Abhimanyu
  • Sep 25 2022 8:01PM

परळी: श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान आयोजित दुर्गुसवात आज सोमवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी  मुख्य संयोजक तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुमनताई फुलचंद कराड यांच्या हस्ते देवीची घटस्थापना होणार आहे. सायंकाळी चार वाजता मोंढा मार्केट येथे हा कार्यक्रम होणार आहे दरम्यान उद्या दिनांक 27 सप्टेंबर पासून पुढील नऊ दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.

     कोरोना कालावधीत थांबलेली नवरात्र उत्सवाची परंपरा फुलचंद कराड यांनी पुन्हा कायम ठेवली असून आज दिनांक 26 सप्टेंबर पासून 2022 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आज दिनांक 26 सप्टेंबर सायंकाळी चार वाजता देवी मूर्तीची घटस्थापना होणार आहे. मोंढा मैदान येथे देवीची मूर्ती आकर्षक व अत्यंत कल्पक रित्या सजविण्यात आली आहे.  संयोजक फुलचंद कराड व त्यांच्या सुविद्य पत्नी सुमन ताई कराड यांच्या हस्ते देवीची स्थापना होणार आहे. संयोजकाकडून संपूर्ण कार्यक्रमाची जयंती तयारी करण्यात आली असून आज होणाऱ्या कार्यक्रमात भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

*उद्या होणार उद्घाटन*
महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या हस्ते दि. 27 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. याच वेळी सिने अभिनेत्री अर्चना सावंत कोल्हापूर यांचा अप्सरा आली हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात तेजश्री प्रधान या सुद्धा सहभागी होणार आहेत. दरम्यान हा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता होणार आहे. तसेच आठवडाभर दुर्गोत्सवात अनेक कार्यक्रम होणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार