सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

के.एस.तुपसागर यांना महानिर्मितीच्या वतिने सेवानिवृत्तीबद्दल निरोप

मुख्य अभियंता भदाणे यांच्याहस्ते तुपसागर यांचा सपत्नीक सत्कार

Abhimanyu
  • Feb 3 2023 10:11PM
परळी :परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रातील जलप्रक्रिया विभागातील कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ के.एस.तुपसागर हे दि.31जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले.महानिर्मितीच्या वतिने निरोप देण्यात आला.तुपसागर यांनी केलेल्या निष्कलंक सेवेचा अनुभव सांगताना महानिर्मितीचे अधिकारी व सहकारी कर्मचारी भावुक झाले होते.यावेळी मुख्य अभियंता भदाणे यांच्याहस्ते के.एस.तुपसागर व सौ.संगिता तुपसागर यांचा सत्कार करण्यात आला.
 महानिर्मिती कंपनीत 32 वर्षाची सेवा पुर्ण करुन के.एस.तुपसागर हे सेवानिवृत्त झाले.परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रात त्यांनी दीर्घकाळ सेवा करत विजनिर्मीती केंद्रास पर्यावरणाचा पुरस्कार मिळवुन दिला होता.परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रातील जलप्रक्रिया विभाग व प्रशासनाच्या वतिने आपल्या विभागात कार्यक्रम घेवुन तुपसागर यांना निरोप देण्यात आला.यावेळी अधिक्षक अभियंता संभाजी बुकतारे यांनी आपल्या भाषणात तुपसागर यांनी परळी येथे सेवा करताना सर्वांना सोबत घेत महानिर्मिती कंपनीची सेवा करताना काटकसर कशी करावी हे आपल्या आचरणातुन शिकविले.त्यांच्या या कार्याचा कर्मचार्याबरोबरच महानिर्मिती कंपनीला भविष्यात फायदा होईल असे सांगुन त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी नागपूरचे सेवानिवृत्त अधिक्षक रसायनशास्त्रज्ञ डॉ. एच.डी.वासनिक ,उपमुख्य अभियंता एच.के.अवचार,अधिक्षक अभियंता आर.पी.रेड्डी,वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद येरणे,धनंजय कोकाटे,अरविंद येळे,जगन्नाथ देशमाने,सतीश मुंडे,भगवान साकसमुद्रे,कामगार नेते बी.एल.वडमारे,गोविंद नागरगोजे,केशव कुकडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन महेंद्र शिंदे यांनी आभार कल्याण अधिकारी दिलीप वंजारी यांनी मानले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार