सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कृष्णाई मल्टी सर्विसेस कडून शेतकऱ्याची फसवणूक*

पिक विमा भरल्याच्या दिल्या बोगस पावत्या; मरळवाडी येथील शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान*

Abhimanyu
  • Nov 19 2022 1:04PM
परळी प्रतिनिधी परळी तालुक्यातील मरळवाडी येथील एका शेतकऱ्याची फसवणूक परळी शहरातील कृष्णाई मल्टी सर्विसेस करून करण्यात आली आहे पिक विमा भरल्याच्या बोगस पावत्या देऊन शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान संबंधित मल्टी सर्विसेस कडून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून सबंधित मल्टी सर्विसेस मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती अशी की,मौजे मरळवाडी येथील सुग्रीव महादू आंधळे या शेतकऱ्याने 2020 व 2021 मध्ये त्यांच्या नावाने असलेल्या शेत जमिनीमध्ये सोयाबीन या पिकाची लागवड केली व सोयाबीन या खरीप पिकाचा पिक विमा सदरील मल्टीसर्विस वर भरला.  सन 2020 व सन 2021 ला 1800 रुपये तसेच मल्टी सर्विसेस भरून ऑनलाईन विमा भरणा करावा अशी विनंती केली. परंतु कृष्णाई मल्टी सर्विसेस चे दीपक अंतराम आंधळे यांनी सुग्रीव महादू आंधळे यांचा पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन पद्धतीने भरला नाही तसेच त्यांना पिक विमा भरल्याच्या संगणकीकृत बोगस पावत्या दिल्या.2021 चा पिक विमा मंजूर झाला परंतु संबंधित मल्टी सर्विसेस च्या संचालकांनी पिक विमा ऑनलाईन न भरल्याने शेतकऱ्याला पिक विमा पासून वंचित राहावे लागले. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.याप्रकरणी सुग्रीव पिता महादू आंधळे यांच्या फिर्यादीवरून कृष्णाई मल्टी सर्विसेस संचालक दीपक आंधळे यांच्याविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुरनं 0260 कलम 420, 467, 468 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार