सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिंपी समाजातर्फे 15 शिवण मशीन वाटप

दि.२१/०८/२०२१वार- शनिवार रोजी अ.भा.श्री.क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था तसेच स्वामी नारायण ट्रस्ट- कल्याण,आर.एस.पी.अधिकारी युनिट - कल्याण,ठाणे व नंदुरबार जिल्हा शिंपी समाज कार्यकारणी तर्फे मध्यवर्ती संस्थेच्या आत्मनिर्भर शिवण मशीन मदत

Nandurbar MH
  • Aug 23 2021 4:58PM

नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे

दि.२१/०८/२०२१वार- शनिवार रोजी अ.भा.श्री.क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था तसेच स्वामी नारायण ट्रस्ट- कल्याण,आर.एस.पी.अधिकारी युनिट - कल्याण,ठाणे व नंदुरबार जिल्हा शिंपी समाज कार्यकारणी तर्फे मध्यवर्ती संस्थेच्या आत्मनिर्भर शिवण मशीन मदत योजने अंतर्गत ज्यांना शिवण काम येते परंतु स्वतःचे मशीन नाही,अशा गरजु लोकांसाठी शिवण मशीन वाटप कार्यक्रम जेष्ठ नागरीक सभागृह(नेहरूनगर),नंदुरबार येथे घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.रविंद्र बाबा बागुल तर प्रमुख अतिथी म्हणून विश्वस्त सर्वश्री शांतारामबापू सावळे व सुनिलबापू निकुंभ,स्वामी नारायण ट्रस्ट कल्याणचे डॉ.दिनेशजी ठक्कर,आर.एस.पी.कमांडर डॉ.श्री.मणीलाल शिंपी, शिक्षणाधिकारी श्री.मच्छिंद्र कदम ,मुख्य सचिव श्री.संजय खैरनार ,सहसचिव सर्वश्री आर.टी.सोनवणे,वनेश खैरनार,रोहीत तरटे,युवक आघाडी अध्यक्ष श्री.प्रमोद शिंपी,सहखजिनदार श्री.जयंत कन्नडकर,दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक श्री.किशोरभाई पाटील,आर.एस.पी.अधिकारी सर्वश्री बन्सीलाल महाजन व घनश्याम सोनवणे,सामाजिक कार्यकर्त्या जोशीलाबेन पगारिया व आरतीबेन दुसेजा,जळगांव जिल्हा संघटक श्री.दिलीप कापडणे,नंदुरबार जिल्हाध्यक्ष श्री.सुभाषजी सावळे,कार्याध्यक्ष श्री.सोमनाथ शिंपी,कोषाध्यक्ष श्री.बलवंत निकुंभ,जिल्हा संघटक श्री.गजेंद्र शिंपी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख श्री.विजय डी. चव्हाण म..का.सदस्य सर्वश्री राजेंद्र जगताप व अजय,चव्हाण,जिल्हा सदस्य श्री.दत्तात्रय अहीरे,युवक अध्यक्ष श्री.मुकेश शिंपी,नामविश्व प्रतिनिधी श्री.हिरालाल शिंपी,युवक सचिव श्री.प्रसाद कापूरे,शहादा तालुकाध्यक्ष श्री.नाटेश्वर चव्हाण,महिला अध्यक्षा सौ.रंजनाताई शिंपी,महिला सदस्या सौ.सरिता भामरे,सौ.सिंधुबाई निकुंभ,जिल्हा युवती अध्यक्षा सौ.पूजा शिंपी व नंदुरबार जिल्हा व शहरातील असंख्य समाज बंधू भगीनींची उपस्थिती होती.
सर्वप्रथम श्री संत शिरोमणि *नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले .स्वामी नारायण ट्रस्ट कल्याण यांच्या मार्फत ४०मशीन मध्यवर्ती संस्थेला मिळवून देणारे मा.डॉ. मणिलाल शिंपी यांचा सपत्नीक तसेच त्यांच्या  कुटुंबियांचा समाजातर्फे सत्कार करण्यात आला,डॉ.मणिलाल शिंपी यांचे गुरुजन निवृत्त मुख्याध्यापक सर्वश्री मोहनभाई पटेल व छोटूभाई पाटील यांचा ही शाल,पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
 *अ.भा.श्री.क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेला 40 मशीन दिल्याबद्दल मध्यवर्ती संस्थे तर्फे डॉ.दिनेशभाई ठक्कर यांचा स्मृतिचिन्ह,पुष्पगुच्छ व शाल देवून विशेष सत्कार करण्यात आला.* 
       प्रास्ताविकात मुख्य सचिव श्री.संजय खैरनार यांनी शिलाई मशीन वाटप कार्यक्रमाचे स्वरूप व महत्त्व सांगितले.समाजातील गरजू लोकांना स्वयंरोजगाराची संधी मिळावी हा प्रमुख उद्देश या योजनेचा असल्याचे सांगितले.
माजी राष्ट्रीय अध्यक्ष व विश्वस्त  श्री.सुनिल बापु निकुंभ यांनी उपक्रमाला शुभेच्छा देऊन समाज कार्याचे महत्व सांगितले.
डॉ.मणिलाल शिंपी यांनी आपल्या मनोगतात मी दाता नसून समाजाचा सेवक आहे. त्यांनी शिवण कामाला कशाप्रकारे प्रोत्साहन देता येईल याविषयी आपले विचार मांडले.समाज कार्यात सर्वांनी सहभाग घ्यावा असेही आवाहन केले.* 
विश्वस्त श्री.शांतारामबापु सावळे यांनी डॉ.श्री.मणिलाल शिंपी यांच्या विषयी बोलतांना सांगितले की, 40 मशिन देणारा दाता हा आमच्या समाजाचा आहे.हे ऐकुन आमचा आनंद द्विगुणित झाला.  नंदुरबार शिंपी समाजातर्फे नेहमी चांगले उपक्रम राबविले जातात त्याबद्दल कौतुक केले अशाच प्रकारे पुढेही उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार