सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खांडबारा येथे चोरीच्या उद्देशाने लपलेल्या संशयितांवर पोलिसांची कारवाई

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे चोरीच्या उद्देशाने लपून बसलेल्या एकाविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

Nandurbar MH
  • Sep 8 2021 3:37PM

 

 नंदुरबार : नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे चोरीच्या उद्देशाने लपून बसलेल्या एकाविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

विसरवाडी पोलीस ठाण्यांतर्गत खांडबारा औटपोस्टचे कर्मचारी सोमवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास गावातील मेन रोडवर गस्त करत असताना एका मोबाईल दुकानाच्या आडोश्याला एकजण लपल्याचे दिसून आले होते. पथकाने त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने दिलीप कृष्णा वसावे रा. उमरीपाडा ता. नवापूर अशी ओळख दिली. तो चोरीच्या उद्देशाने लपल्याचे समजून आल्याने त्याच्याविरोधात पोलीस शिपाई प्रविण अहिरे यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तपास पोलीस हवालदार सुरेश चौरे करत आहेत.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार