सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मोबाईल डिलरशीपच्या बहाण्याने तरुणाला दोन लाखात गंडवले

डीलरशिप मिळवून देण्याचे सांगत मोबाईल कंपनीच्या तोतया

Nandurbar MH
  • Sep 25 2020 11:01AM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार - डीलरशिप मिळवून देण्याचे सांगत मोबाईल कंपनीच्या तोतया अधिकाऱ्यांनी सुमारे पावणेदोन लाख रुपये बँकखात्याच्या माध्यमातून लुबाडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून नवापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवापूर येथील रितिक कोडवाणी या 18 वर्षीय युवकाचा एम एस राठोड पवन कुमार आणि सफदर खान असे नाव सांगणाऱ्या तीन जणांशी संपर्क आला. विवो कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांनी कोडवाणी ह्याला विवो कंपनीची डीलरशिप मिळवून देतो असे सांगितले. कंपनीचे पत्रदेखील रितीकला देण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून रितीकने 14 मे 2019 पासून जून 2020 या कालावधीत वेळोवेळी त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात सुमारे 1 लाख 82 हजार रुपये जमा केले. परंतु पाहिजेे ती प्रक्रिया पूर्ण न करता हळूहळू त्यांनी संपर्क खंडित केला. नंतर ते पत्र बनावट असल्याचे आणि ते लोक कंपनीचे अधिकारी नसल्याचे रितिक याला लक्षात आले. नवापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी याविषयीची फिर्याद दिली. नवापुर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेत अधिक तपास सुरू केला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार