सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कापुस पिकावरील किडींचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन

नंदुरबार : कपाशी पिकावर सुरूवातीच्या काळात प्रामुख्याने मावा आणि तुडतुडे ह्या रसशोषक कीडीचा प्रादुर्भाव आढळुन येत असल्याने

Nandurbar MH
  • Jul 19 2021 10:43AM


नंदुरबार : कपाशी पिकावर सुरूवातीच्या काळात प्रामुख्याने मावा आणि तुडतुडे ह्या रसशोषक कीडीचा प्रादुर्भाव आढळुन येत असल्याने शेतकऱ्यांनी कापुस पिकावरील मावा व तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

कीडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकाचे सर्वेक्षण करावे. प्रादुर्भावग्रस्त फांद्या, पाने इतर पालापाचोळा जमा करुन किडींसहित नष्ठ करावे. शेतात वेळेवर आंतरमशागत करुन पीक तणविरहीत ठेवावे. किडीचे पर्यायी खाद्य  तणे जसे अंबाळी, रानभेंडी इत्यादी नष्ट करावीत. मृद परिक्षणाच्या आधारावर खत मात्रेचा अवलंब करुन दोन ओळीतील व दोन झाडातील अंतर योग्य ठेवावे आणि जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा, जेणेकरुन कपाशीची अनावश्यक कायीक वाढ होणार नाही आणि पीक दाटणार नाही. 

बीटी कपाशीच्या बियाण्याला इमिडाक्लोप्रिड किंवा थायोमेझोक्साम किटकनाशकांची बिज प्रक्रिया  केलेली असते. त्यामुळे रस शोषक कीडींपासून सर्वसाधारण 2 ते 3 आठवड्यापर्यंत  पिकास संरक्षण मिळते त्यामुळे या काळात किटकनाशकाची फवारणी करु नये.

रस शोषक किडीवर उपजिविका करणारे नैसर्गिक किटक उदा. सीरफिड माशी, कातीन, ढालकिडे, क्रायसोपा,ॲनॅसयीस प्रजातीचा परोपजीवी किटक संख्या पुरेशी आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकचा वापर करु नये.  प्रादुर्भाव जास्त असल्यास रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा ॲझाडीरेक्टिन 0.03 टक्के निंबोळी तेल आधारित डब्ल्युएसपी 30 मिली किंवा ॲझाडीरेक्टिन 5 टक्के (डब्ल्युडब्ल्युएनएसकेई) 20 मिली किटकनाशकाची फवारणी करावी. 

वरिल सर्व उपाययोजना अवलंब करुनही किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्याचे आढळुन आल्यास  बुप्रोफेजीन 25 टक्के प्रवाही 20 मिली, डॉयर्फेथ्युरॉन 50 टक्के पाण्यात मिसळुन भुकटी 12 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फलेनिकमाईड 50 टक्के डब्ल्युपी 3 ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड 20 एसपी 1 ग्रॅमची यापैकी एक रासायनिक किटकनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रत्येक फवारणीला एकच किटकनाशक न वापरता आळीपाळीने त्यांचा वापर करावा असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नंदुरबार यांनी कळविले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार