सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

‘दिशा’ समितीची बैठक संपन्न

नंदुरबार दि.17: जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीची बैठक खासदार डॉ.हिना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली.

Nandurbar MH
  • Jan 18 2022 12:58PM

 
नंदुरबार  दि.17: जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीची बैठक खासदार डॉ.हिना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली. बैठकीस आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, अशासकीय सदस्य, डॉ.कांतीलाल टाटीया, डॉ.स्वप्नील बैसाणे,  हरी पाटील, सविता जयस्वाल आदी उपस्थित होते.

 यावेळी खासदार डॉ. गावित म्हणाल्या,  केंद्रीय योजनेअंतर्गत विद्युतीकरणाचा लाभ देण्यासाठी ज्या भागात वीज पोहचली नाही अशा गावांचे सर्वेक्षण करावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना, प्रधानमंत्री कुसूम योजनेंतंर्गत सौर पंपाचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. लसीकरण ही केंद्र शासनाची मोठी योजना असून पात्र नागरिकांचे लसीकरण करुन घ्यावेत. नंदुरबार येथे डायलेसेस सेटरची संख्या वाढविण्यात यावी. पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा.जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी, दलित व आदिवासी वस्तीमध्ये वैयक्तिक शौचालय योजनेचा लाभ देण्यात यावा. सर्व बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ देण्यात यावा. जिल्ह्यात पिक कर्ज वाटपाबाबत किती कर्ज वाटप केले याची माहिती बँकेने उपलब्ध करुन द्यावीत.मुद्रा योजनेचा लाभ देण्यात यावा. 

यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, सौभाग्य योजना, प्रधान मंत्री कुसूम सौर पंप योजना, अटल सौर कृषी पंप, प्रधानमंत्री आवास योजना, बाल विकास विभाग, बँक,आरोग्य, शिक्षण विभाग, रोजगार हमी योजना आदी विविध विभागांशी संबंधित केंद्रीय पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार