सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेशाकरिता मुदतवाढ

नंदुरबार : दि .15: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक

Nandurbar MH
  • Sep 15 2021 7:41PM

 

नंदुरबार : दि .15: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये शैक्षणिक वर्ष सन 2021-2022 प्रवेशासाठी इयत्ता सहावीच्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता अनुसुचित आणि आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांकडून 31 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. परंतु कोविड-19 विषाणुच्या प्रादुर्भावामुळे व काही आस्थापनांच्या शाळा सुरु न झाल्याने अर्ज स्विकारण्यास 25 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून इच्छुकांनी प्रवेशासाठी अर्ज सादर करावा असे आवाहन  प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी केले आहे.

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल मध्ये प्रवेशासाठी पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांना https://admission.emrsmaharashtra.com ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन भरुन त्यासोबत मागील वर्षांचे  इयत्ता सहावीत प्रवेश घेण्याकरिता पाचवीचे गुणपत्रक, सातवीत प्रवेश घेण्याकरिता सहावीचे गुणपत्रक, आठवीत प्रवेशासाठी सातवीचे गुणपत्रक तर नववीत प्रवेश घेण्याकरिता आठवीचे गुणपत्रक अपलोड करणे आवश्यक राहील. 

गुणपत्रकासंबधी शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये ज्या विद्यार्थ्यांची आकारीक व संकलित मुल्यमापन झालेले आहे अशा विद्यार्थ्यांचे संबधित इयत्तेचे नऊ विषयांचे ( मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान,परीसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे, कला, कार्यानुभव व शारीरीक शिक्षण) प्रत्येकी 100 गुणांचे गुणपत्रक तयार करावे. ज्या विद्यार्थ्यांचे फक्त आकारीक मुल्यमापन प्रक्रिया पुर्ण झालेली आहे त्या विद्यार्थ्यांचे आकारीक मुल्यमापनाचे विषयनिहाय प्राप्त गुण 100 मध्ये रुपांतरीत करावे. संबंधित इयत्तेचे नऊ विषयांचे प्रत्येकी 100 पैकी गुण विचारात घेऊन 900 गुणांचे गुणपत्रक तयार करावे. पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी वेबलिंकवर गुणपत्रक अपलोड करतांना गुणपत्रक 900 गुणांचे असल्याची खात्री करुन घ्यावी. शाळेकडून श्रेणी प्रदान केलेले गुणपत्रक गुणांमध्ये रुपांतरीत करुन घ्यावे. श्रेणी नमूद केलेले गुणपत्रक प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार नाही.

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता अर्जदार विद्यार्थ्यांचा सरल पोर्टलवरुन विद्यार्थी आयडी (19 अंकी) माहित असणे आवश्यक असेल. विद्यार्थ्यांचा सरल आयडी आणि मोबाईल क्रमांक टाकून अर्जदार विद्यार्थ्यांचा पासवर्ड तयार करुन घ्यावा. पासवर्ड नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ एसएमएसद्वारे कळविला जाईल. विद्यार्थ्यांला ज्या इयत्तेमध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे त्याची अचुक नोंद अर्जामध्ये करावी. विद्यार्थी आदिम जमातीमधील असेल तसे नमूद करावे. विद्यार्थ्यांनी फॉर्म भरतेवेळी मोबाईल क्रमांक व जन्म तारीख टाकणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांच्या मागील इयत्तेची  गुणदान केलेली गुणपत्रिकेची स्कॅन केलेली प्रत आवश्यक असेल. शाळेतील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरलेले असल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती स्वतंत्र भरावी तसेच स्वतंत्र गुणपत्रक अपलोड करावे.

अर्ज भरल्यानंतर एखादी माहिती दुरुस्त करावयाची असल्यास विद्यार्थ्यांचा सरल क्रमांक व पासवर्ड टाकून पुन्हा लॉगीन करुन माहितीत दुरुस्ती करावी व अर्ज अपडेट करावा. प्रवेश प्रक्रीयेसंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा सर्वाधिकार महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी नाशिक या संस्थेस असेल. 

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार