सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त* *जिल्ह्यात 75 पशुवैद्यकीय शिबिरांचे आयोजन

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आझादी का अमृत महोत्सवाच्यानिमित्ताने व स्वराज्य महोत्सव उपक्रमातंर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत नंदुरबार

Sudarshan MH
  • Aug 13 2022 7:42AM
**

                नंदुरबार, दि.11 (जिमाका वृत्तसेवा): भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आझादी का अमृत महोत्सवाच्यानिमित्ताने व स्वराज्य महोत्सव उपक्रमातंर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यातील 75 गावांमध्ये पशुवैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ञ पशुवैद्यक अधिकारी पशुपालकांना मार्गदर्शन व पशुंची तपासणी करणार आहेत. या शिबिराचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी केले आहे.

              या शिबीरात पशुंची आरोग्य तपासणी, औषधोपचार, आवश्यक तेथे शस्त्रक्रिया, गो-ह्यांचे खच्चीकरण, गाई म्हशींची वंध्यत्व तपासणी व उपचार, गर्भ तपासणी, शेळ्या मेंढ्यांचे जंत निर्मूलन इ. सेवाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

            जिल्ह्यात आजपासून सुरु झालेले हे शिबिर 18 ऑगस्ट, 2022 पर्यंत चालणार असून तालुकानिहाय शिबीर पुढील प्रमाणे असेल.
 
            11 ऑगस्ट रोजी नवापूर तालुक्यातील देवलीपाडा, खोकसा, वडकळंबी, बिजागाव, मडवण, बिलीपाडा, नांदवन, सुळी, 12 ऑगस्ट रोजी कोठाडा, बिलबारा, खातगाव, पांघरण, खेकडा, भरडू, आमपाडा तर 17 ऑगस्ट रोजी घोगलापाडा व विजापूर येथे शिबीर होईल. 

           शुक्रवार 12 ऑगस्ट, 2022 रोजी तळोदा तालुक्यातील तळोदा, लाखापूर, पडाळपूर, शेलवाई, रेवानगर तर नंदुरबार तालुक्यात याच दिवशी रनाळे खु,निंबेल, धमडाई, कोळदा, रनाळा, चाकळे.

           शनिवार 13 ऑगस्ट रोजी बोराळा, शनिमांडळ, खोंडामळी, तर 15 ऑगस्ट रोजी भालेर, उमर्दे ब्रु. येथे 16 ऑगस्ट रोजी वावद, 17 ऑगस्ट रोजी दहिदुले, जैताणे, नादरर्खे, न्याहळी, खामगाव येथे.

          धडगाव तालुक्यात 11 ऑगस्ट रोजी बोदला, 12 ऑगस्ट कुकतार, 13 ऑगस्ट धनाजे, 14 ऑगस्ट शेलकुई, 15 ऑगस्ट सिसा, 16 ऑगस्ट खामला, 17 ऑगस्ट वरखेडी, 18 ऑगस्ट गोरंबा येथे होईल. 

           शहादा तालुक्यात 11 ऑगस्ट रोजी पिंप्री, वडछील, सोनवद, नांदरर्डे, गोगापूर, काथर्दे दि. पुर्नवसन 12 ऑगस्ट रोजी जयनगर, सुलवाडे, फेस, टेंभा, नागसरी, वडगाव, खरगोन, 13 ऑगस्ट रोजी करजई, कळंबू, वरुळ कानडी, पाडळदा, तितरी, काकरदा 14 ऑगस्ट रोजी भादे येथे.

          अक्कलकुवा तालुक्यात 11 ऑगस्ट रोजी काठी, 12 ऑगस्ट पोरंबी, 13 ऑगस्ट सिंगपूर खु , 14 ऑगस्ट आमली, 15 ऑगस्ट जुगलखेत, 16 ऑगस्ट नवानागरमुठा, 17 ऑगस्ट दिगीअंबा, वालंबा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
00000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार