सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विवाहितेचा छळ करणाऱ्या अजनाड बंगल्याच्या आरोपी पतीला एक वर्ष कारावासाची शिक्षा

आरोपी पतीला एक वर्ष कारावासाची शिक्षा

Sudarshan MH
  • Aug 6 2022 8:41AM


नंदुरबार - ५० लाखांसाठी तालुक्यातील नागसर येथील विवाहितेचा छळ करणाऱ्या अजनाड बंगला ता.शिरपूर येथील
आरोपी पतीला नंदुरबार कोर्टाने एक वर्ष साधा कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.सदर निकाल मुख्य न्यायदंडाधिकारी विनोद चव्हाण यांनी दिला आहे.

सदर खटल्याची हकीकत अशी की, नागसर ता.नंदुरबार येथील श्रीमती विमल बाबुलाल राठोड (२६) यांचा विवाह अजनाड बंगला ता.शिरपूर येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर बाबुलाल दरबार राठोड यांच्याशी झाला होता.दरम्यान लग्नानंतर विवाहितेचा चारित्र्याचा संशय घेऊन तसेच फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन ५० लाख रुपये आणावेत यासाठी पती व सासरच्या मंडळींनी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला होता.याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा सखोल तपास हवालदार साहेबराव चौरे यांनी करुन आरोपींविरुद्ध नंदुरबार न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.दरम्यान या खटल्याची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी विनोद चव्हाण यांच्या समोर झाली.न्यायालयाने आरोपी पती बाबुलाल दरबार राठोड याला दोषी धरत १वर्ष साधा कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास देण्यात येईल.खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील सुनील पाडवी यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून हवालदार पंकज बिरारे यांनी काम पाहिले. सदर खटल्यातील यशाबद्दल तपास अधिकारी व सरकारी वकील यांचे अभिनंदन पोलिस अधीक्षक यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार