सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार येथे कापसाचे बोगस बियाणे जप्त, पिंपळोदच्या एकावर गुन्हा

नंदुरबार- तालुक्यातील पिंपळोद येथे कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकाने धाड टाकून १ लाख ११ हजार चारशे रुपये

Nandurbar. MH
  • May 29 2022 12:28PM
नंदुरबार येथे कापसाचे बोगस बियाणे जप्त, पिंपळोदच्या एकावर गुन्हा
नंदुरबार- तालुक्यातील पिंपळोद येथे कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकाने धाड टाकून १ लाख ११ हजार चारशे रुपये किंमतीचे एचबीटी कंपनीचे कापसाचे बोगस बियाणे जप्त केले आहे.
पिंपळोद गावात बोगस कापसाच्या बियाण्याची साठवणूक करुन अवैध विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकाला मिळाली होती.त्यानुसार पथकाने दि.२८ मे रोजी सकाळी ११.२५ वाजता पिंपळोद येथील निलेश राजाराम पाटील यांच्या घरी  छापा टाकून गोल्डन ४ जी,शिवम या कापसाच्या वाणाचे बोगस बियाणे जप्त केले.सुमारे ९७ पॉकीटे पथकाने जप्त केली.सदर कारवाई जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी, निरीक्षक नितेंद्र पानपाटील, मोहीम अधिकारी महेश विसपुते, कृषी अधिकारी हिवराळे, विभागीय सहसंचालक विवेक सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.बागेश्वर,जि.प.कृषी अधिकारी वाटे,तंत्र अधिकारी संजय शेवाळे यांच्या पथकाने केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार