सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबईकरांना राहत्या घरीच कोरोनाची लस मिळण्याची तयारी ;भाजप ने केली होती मागणी..

मुंबई : राज्यात ठिकठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबईतही बाधितांचा आकडा वाढत आहे.

Sudarshan MH
  • May 4 2021 5:15PM


मुंबई : राज्यात ठिकठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबईतही बाधितांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना राहत्या घरीच कोरोनाची लस मिळण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका प्रशासन लवकरच याबाबतचा मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

भाजप खासदाराचे पालिका आयुक्तांचे पत्र

मुंबईकरांना राहत्या घरी कोरोनाची लस देण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केली जात आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत डोअर टू डोअर लस देण्याची मागणी भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केली होती. मनोज कोटक यांनी गुरुवारी 29 एप्रिलला याबाबतचे एक पत्र मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना लिहिले होते. यात मनोज कोटक यांनी पालिकेच्या सहकार्याने स्वयंसेवी संस्थांना वैद्यकीय सुविधेसह परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

नियमांचे पालन करून लसीकरण 

मनोज कोटक यांच्या मागणीवर पालिकेकडून सकारात्मक विचार सुरु असल्याचे माहिती मिळत आहे. त्यानुसार, एखाद्या सोसायटीचा थेट रुग्णालयाशी टायअप करायचा. त्यानंतर सर्व नियमांचे पालन करून लसीकरण करायचे, अशी संकल्पना पालिका प्रशासन अमलात आणू शकते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार