सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

केंद्र सरकारच्या राजभाषा समितीच्या कार्यकारी संयोजक पदी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे

कार्यकारी संयोजक पदी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे

Sudarshan MH
  • Dec 5 2020 3:17PM
प्रतिनिधी दिपक चव्हाण पुणे

 केंद्रीय राजभाषा समितीच्या कार्यकारी संयोजक पदी मावळचे शिवसेना खासदार महासंसदरत्न
श्रीरंग बारणे यांची नियुक्ती झाली आहे.ही मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे.
 
राजभाषा समिती १९७६ साली अस्तित्वात आली आहे.  या समितीत ३० सदस्य असतात. लोकसभेतील २० आणि राज्यसभेतील दहा सदस्य असतात. या समितीचे अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा आहेत. ही समिती देशभरातील केंद्रीय कार्यालयांमध्ये हिंदी भाषेचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम करते. त्याचा आढावा घेते. खासदार बारणे यांनी मागील पाच वर्ष या समितीत सदस्य म्हणून काम केले आहे. वरिष्ठ सदस्य म्हणून खासदार बारणे यांची समितीच्या संयोजकपदी नियुक्ती झाली आहे.
याबाबत बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ''राजभाषा समितीच्या माध्यमातून हिंदी भाषेसाठी चांगले कार्य करता येते. केंद्र सरकारच्या अनेक कार्यालयांचा अभ्यास केला जातो. हिंदीचा प्रसार करणे या समितीचा मूळ उद्देश आहे. केंद्र सरकारच्या ज्या कार्यालयांमध्ये हिंदीचा वापर केला जात नाही. त्यांना अधिका-अधिक हिंदी भाषेचा वापर करण्यास भाग पाडणे. १९७६ साली ही समिती अस्तित्वात आली आहे. ही एकमेव अशी समिती आहे की त्याचा अहवाल लोकसभेत सादर केला जात नाही. थेट देशाच्या राष्ट्रपतींना सादर केला जातो. संसदेतील ही एक सक्षम समिती आहे''.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार