सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ममता बॅनर्जी यांनी रा. स्व. संघाचे कौतुक केल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले

एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि माकपाने या वक्तव्यानंतर ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली आहे

Abhimanyu Phad
  • Sep 2 2022 6:58PM
कोलकाता- तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे. ममता यांच्या विधानावर आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे, या वक्तव्यात ममता बॅनर्जी यांनी राषट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सगळीच वाईट लोकं नाहीत. त्यातले काही भाजपाचे समर्थन करीत नाहीत, अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केले होते. या त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून तिखट प्रतिक्रिया येण्यासही सुरुवात झालेली आहे. ममता यांच्या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर टीका करण्यास विरोधकांनी सुरुवात केली आहे.

एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि माकपाने या वक्तव्यानंतर ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली आहे. माकपाचे नेते मोहम्मद सलीम यांनी ममता बॅनर्जी या संघाची दुर्गा असल्याची टीका केली आहे. तर ओवेसी म्हमाले की, ममता यांनी यापूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशभक्त असल्याचे म्हणालेल्या आहेत. या सगळ्या टीकेनंतर ममतांची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार